🕒 1 min read
मुंबई : आज (१० जुलै) आषाढी एकादशी निमित्त राज्यभरातून राजकीय मंडळीकडून नागरिकांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. भाजप नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी विठुरायाकडे राज्याच्या शेतकऱ्यांसाठी साकडे घातले आहे. “कष्टकरी शेतकरी बहुजनांचं दैवत श्री विठ्ठलाचा जयघोष सुरू आहे. आषाढी एकादशी निमित्त सान-थोर मंडळी उत्साहात विठूरायाच्या भक्तीत लीन आहेत. श्री विठूरायाकडे एकच मागणं, या महाराष्ट्रात शेतीला सन्मान, कष्टाला मान, प्राणी-पक्ष्यांचं गान राहू दे. जय हरी विठ्ठल.विठ्ठल बिरूदेवाच्या नावानं चांगभलं”, असे ट्वीट पडळकर यांनी केले आहे.
तर आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रथेप्रमाणे आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा पार पडली. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची ही पहिलीच महापूजा होती. मुख्यमंत्र्यांनीही शेतकऱ्यांसाठी विठ्ठलाला साकडे घातले.
कष्टकरी शेतकरी बहुजनांचं दैवत श्री विठ्ठलाचा जयघोष सुरू आहे.आषाढी एकादशी निमित्त सान-थोर मंडळी उत्साहात विठूरायाच्या भक्तीत लीन आहेत.श्री विठूरायाकडे एकच मागणं.या महाराष्ट्रात शेतीला सन्मान,कष्टाला मान,प्राणी-पक्ष्यांचं गान राहू दे.जय हरी विठ्ठल.विठ्ठल बिरूदेवाच्या नावानं चांगभलं pic.twitter.com/7R9zYhSQW5
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLA) July 10, 2022
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले कि, “माझ्यासाठी आजचा दिवस आनंदाचा असून आज मी १२ कोटी जनतेच्या वतीने विठ्ठलाची पूजा केली. शेतकरी, कष्टकरी, कामगार अशा सर्व घटकांना सुख समृध्दी लाभू दे, असे साकडे विठूरायाला मी घातले आहेत. तसेच देशभरातील विविध मोठ्या देवस्थानाच्या ठिकाणी भाविकांसाठी सोयी सुविधा असतात. त्याच प्रकारच्या सोयी सुविधा पंढरपुरात निर्माण करणार असून त्यासाठी विशेष आराखडा तयार करण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. लवकरात लवकर डीपीआर तयार झाल्यास शासन त्यांना मंजुरी देईन. असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- ‘‘माझी इथं इज्जत…”, वृद्धिमान साहानं सांगितलं बंगाल संघाला सोडण्याचं कारण!
- Prarthana Behere : प्रार्थना बेहरेच्या घरात आला नवा पाहुणा ; पाहा VIDEO
- Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंची ‘आरे बचाव’ आंदोलनातून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका; म्हणाले,’ आमच्यावरचा राग मुंबईवर…’
- Sri Lanka crisis : श्रीलंकेचे अध्यक्ष राजपक्षे यांच्या घरात सापडले लाखो रुपये; आंदोलकांचा दावा
- Ashadhi Ekadashi 2022 : आषाढी एकादशी निमित्त जामनेरमध्ये गिरीश महाजनांनी पत्नीसह घेतले माऊलीचे दर्शन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
