🕒 1 min read
औरंगाबाद : दिवसातून अनेकवेळा कन्नड घाट जाम होणे आता अंगवळणी पडले असून अपघात होणे, जीवित हानी होणे,कैक तास वाहतूक ठप्प होणे हा सवयीचा भाग झाल्याचे दैनंदिन वाहतूक करणारे तसेच स्थानिक सांगत आहे. अपघातामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक ठप्प होते. लांब पल्ल्याच्या प्रवासी वाहतूक,जड वाहने ,अबाल वृद्ध ,महिला,उपचारासाठी जाये करणाऱ्या रुग्णांचे प्रचंड हाल या रस्त्याने होत आहे.सदर घाटात अपघात वाहतूक ठप्प ही बाब नित्याचीच झाली. बोगद्याच्या कामाला सुरवात करण्याची मागणी होत आहे. मात्र याकडे अधिकारी-पदाधिकारी केवळ वेळकाढू पणा करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग असल्या कारणाने बोगदा होईल बोगद्याचे टेंडर पाहणी बोगद्याचा अंदाजित खर्च याच बोगद्यातून रेल्वे मार्ग यासारखे स्वप्न दाखवण्यात आले. मात्र बोगदा ही नाही तर घाटाचे रुंदीकरण किंवा डागडुजी देखील व्यवस्थित केल्या जात नसल्याने नागरिकांच्या मनात धगधगत आहे. गेल्या आठवड्यात आठ तास घाट खड्डे बुजविण्यासाठी बंद करण्यात येत असल्याच्या पोस्ट सोशल मीडिया वर फिरत होत्या, मात्र प्रत्यक्षात खड्डे जसेच्या तसे आहेत.काहीवेळा खड्डे बुजविले तरी दुसऱ्या दिवशी परत खड्डे तळ्याचे आक्रस्ताळपणे वाहनांचे स्वागत करण्यात सज्ज असतात.
सतत च्या घाट जाम मुळे तसेच प्रवासी तासन तास ताटकळत असल्याने नागरिक, प्रवासी, वाहन चालक ,मालक ,वृद्ध,उपचार घेणारे प्रवासी रुग्ण मेटाकुटीस येतात. कन्नड बोगद्याच्या प्रश्न धूसर असून या बोगद्याचे काही खरे नाही ,इतर राज्यात बोगदे होतात मात्र या ठिकाणी का नाही? असाही प्रश्न सर्वसामान्य जनता उपस्थित करत असून खानदेश मराठवाडा येथील राजकीय नेते खासदार याकडे लक्ष देतील का? असा सवाल देखील विचारण्यात येत आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सोलापूर धुळे या महामार्गाच्या कामाला सुरुवात केली आहे. सोलापूर ते कन्नड या महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच चाळीसगाव ते धुळे या शेवटच्या टप्प्यातल्या कामाला प्रारंभ होणार आहे. परंतु यामध्ये असलेल्या साधारण दहा किलोमीटर लांबीच्या घाटातील कामाचे काय असा प्रश्न उपस्तित होत आहे. शिवाय महामार्ग प्राधिकरणाने याबाबाद याबद्दल अधिकृत खुलासा केलेला नाही. कन्नड ते चाळीसगाव या दरम्यान असलेल्या औट्रम घाट हा अतिशय कठीण आणि धोकादायक घाट म्हणून ओळखला जातो. या औट्रम घाटातील बोगद्याचे काम झाल्यास मराठवाडा व खानदेशच नव्हे तर दक्षिण व उत्तर भारत जोडणारा हा महत्त्वाचा दुवा ठरणार असल्याचे मत तज्ञ व्यक्त करीत आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोटू-पतलूच्या हातात कोंबड्या देऊन युवासेनेचे राणेंच्या विरोधात आंदोलन !
- महाजनांना धक्का : भाजपचे तब्बल 27 फुटल्याने जळगाव महापालिकेत शिवसेनेचा भगवा फडकला
- …म्हणून उर्मिला मातोंडकरांनी खास ट्विट करून आदित्य ठाकरेंचं केलं अभिनंदन
- भारताचा गोलंदाजपटू राहुल शर्माच्या वडिलांचे कोरोनोमुळे निधन
- येत्या वर्षभरात हटवण्यात येणार सर्व टोलनाके; नितीन गडकरींची मोठी घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

