🕒 1 min read
औरंंगाबाद : नवीन पेट्रोलपंप सुरू करण्यासाठी माहेराहुन ५० लाख रूपये आण असे म्हणत तक्रारदार विवाहितेचा छळ करून घराबाहेर हाकलून देणा-या पतीसह सासू-सास-याविरूध्द एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साईराज भानुदास गाडे (वय ३०) असे तक्रारदार विवाहितेचा छळ करणा-या पतीचे नाव आहे. तर भाुनदास रंगनाथराव गाडे (वय ६५), हिरा भानुदास गाडे (वय ५४) असे सासू सास-याचे नाव आहे. तक्रारदार विवाहितेचा छळ करण्यात आल्याची घटना १ जानेवारी ते २० जुन २०२० या काळात घडला असल्याचे पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, सासरच्यांकडून सतत पैस्यांची मागणी तसेच शारीरिक, मानसिक छळाला कंटाळून तक्रारदार महिलेने पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहे.
महत्वाच्या बातम्या
- वाढदिवशी तेजस्विनीनं केली नव्या वाटचालीची सुरुवात ; केली मोठी घोषणा
- ‘आज बाळासाहेब असते, तर कोकणची दुर्दशा पाहून…’; भाजपचं पुन्हा एकदा टीकास्त्र
- वरुडी येथे भरधाव जीप घुसली थेट पोलिसांच्या चेकपोस्टमध्ये; ३ पोलीस जखमी
- मलायका सोबतच्या अफेयरवर अर्जून कपुरने पहिल्यांदाच सोडले मौन, म्हणाला…
- तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा धोका; मुख्यमंत्र्यांनी दिला डॉक्टरांना ‘हा’ खास सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
