🕒 1 min read
मुंबई : राज्यभरात सध्या क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत असल्याने या प्रकरणाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. यातच काल अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला सोडण्यासाठी 25 कोटींची मागणी करण्यात आल्याचा आरोप एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंवर करण्यात आला.
क्रुझ पार्टी प्रकरणी पंच असणारे प्रभाकर साईल यांनी हे आरोप केले आहेत. दरम्यान, समीर वानखेडेंकडून या सर्व आरोपांचं खंडन करण्यात आलंय. सध्या प्रकरणावर काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिलाय. मात्र, प्रभाकर साईल यांनी लावलेले आरोप त्यांनी फेटाळलेत. दरम्यान, आता नवाब मलिकांनी पत्रकार परिषद घेऊन वानखेडेंवर आरोप करणं आणि त्यानंतर प्रभाकर साहिल यांनी गौप्यस्फोट करणं हा योगायोग असू शकत नाही असं भाजप नेते राम कदम यांनी म्हटलंय.
दुसऱ्या बाजूला भाजप नेते आशिष शेलार यांनी देखील या प्रकरणी भाष्य केले आहे. ज्याचा जावई गंजडी म्हणून पकडला गेला त्या मंत्र्याला लाथ मारून मंत्रिमंडळातून हाकलले पाहिजे. अशा मंत्र्यांमुळे महाराष्ट्राची बदनामी होत आहे अशी घणाघाती टीका शेलार यांनी केली आहे. भ्रष्टाचाराविरोधात बोलायचे नाही, भ्रष्टाचाराचे पुरावे द्यायचे नाही, गांजामध्ये अटक झालेल्यांवर कारवाई करायची नाही, महिलांवरील अत्याचाराबाबत बोलायचे नाही हे सर्व प्रश्न मांडले तर महाराष्ट्राची बदनामी होत असल्याची ढाल पुढे करायची. यातून मुख्यमंत्री तुम्ही स्वत:चं पाप लपवू शकत नाही, अशी प्रतिक्रिया पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर दिली.
महत्वाच्या बातम्या
- जगाला सध्या धार्मिक, आर्थिक व राजकीय दहशतवादापासून धोका-रामदेव बाबा
- ‘देख लो यारो, गधे घोडे दौडा रहे है…’; भातखळकरांचा मलिकांना टोला
- ईडी म्हणजे पानतंबाखुचे दुकान, माझ्या घरीही धाड पडू शकते-आ. प्रणिती शिंदे
- पुन्हा रोहितचा फ्लॉप शो! पाहा टी-20 मध्ये पाकिस्तानविरुद्ध खराब रेकॉर्ड
- …तर शेतकऱ्यांना पीकविम्याचे ४००० कोटी रुपये मिळाले असते- देवेंद्र फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
