Share

केंद्रात जेवणाची व्यवस्था नाही म्हणून घरी जातोय, म्हणत कोरोना बाधित रुग्णाने ठोकली धूम

Published On: 

औरंगाबाद: राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत असल्याने शासनाने कोविड सेंटरची बांधणी करत तिथे कोरोना बाधितांना अलगीकरणासाठी ठेवण्यात येत आहे. पण या केंद्रांमध्ये सोया सुविधा नसल्यामुळे कोरोना रुग्ण केंद्रातून धूम ठोकत आहेत. शासकीय निवासी वसतिगृहातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या एका कोरोनाबाधित रुग्णाने रविवारी सकाळीच सामानासह धूम ठोकली. परिसरातील शेतातून जाताना संबंधित बाधित रुग्णाला काही नागरिकांनी पाहिले. त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा केंद्रात जेवणाची व्यवस्था नाही. घरी जातोय असे सांगून तो घराकडे निघून गेला.

तालुक्यातील जानेफळ येथील हा बाधित रुग्ण आहे. तो सध्या औरंगाबाद शहरात वास्तव्यास आहे. गावाकडे आल्यानंतर त्याला कोरोना संसर्गाची बाधा झाल्याने त्याला उपचाराकरिता शासकीय निवासी वसतिगृहातील कोविड केंद्रात भरती करण्यात आले होते. दरम्यान, या केंद्रात जेवणाची व्यवस्था चांगली नाही. याआधीदेखील बाधित रुग्णांकडून तक्रारी केल्या गेल्या होत्या. त्यात संबंधित पलायन केलेल्या रुग्णानेदेखील प्रशासनाकडे जेवणासंबंधी तक्रार केली होती. मात्र, त्यात बदल होत नसल्याने वैतागलेल्या रुग्णाने कोविड सेंटरच्या सुरक्षा भिंतींवरून सामानासह उडी घेऊन पलायन केले. परिसरातील शेतातून जाताना संबंधित बाधित रुग्णाला काही नागरिकांनी पाहिले.

सुविधा मिळत नसल्यामुळेच संबंधितांना कळवूनही ते लक्ष देत नाहीत, त्यामुळे संतापलेला हा युवक सेंटरमधून फरार झाला. मात्र, आठ तास उलटूनही सेंटरमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ही बाब कळली कशी नाही. उशिरा ही बाब उघडकीस आल्यानंतर प्रशासनाची धावपळ उडाली. या रुग्णास शोधून सेंटरमध्ये आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. मात्र, हा रुग्ण शोधून परत आणणे हे जिकिरीचे काम आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!