Share

औरंगाबादेत कोरोनाचा विस्फोट नाहीच! परिस्थिती नियंत्रणात असल्याचा मनपा आयुक्तांचा दावा

Published On: 

औरंगाबाद : ३१ मार्चला शहरात १०९० कोरोना रुग्ण सापडले होते. त्यानंतर मात्र हा आकडा कमी होत गेला. काल शहरात ६१८ कोरोना रुग्ण निघाले. हळूहळू ट्रेंड बदलत आहे. तपासण्या तेवढ्याच होत आहेत मात्र रुग्ण कमी निघत आहेत. औरंगाबादकरांनी काही प्रमाणात नियम पाळले, तसेच अंशतः लॉकडाऊन आणि ब्रेक द चेन या गोष्टींचा देखील रुग्णसंख्या कमी होण्यात हात आहे. कोरोनाबाधितांमध्ये महापालिका हद्दीतील रुग्णांची संख्या ग्रामीण भागाच्या तुलनेने कमी आहे, असा दावा पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी रविवारी (दि.१८ ) केला.

पालिका आयुक्त पांडेय यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून रविवारी संवाद साधला. ते म्हणाले की, मी लसीचे दोन डोस घेऊनही पॉझिटिव्ह आलो. माझ्या सोबतच पालिकेतील इतरही अधिकारी पॉझिटिव्ह आले. मात्र आमच्यापैकी कोणालाही गंभीर त्रास झाला नाही. आम्ही जीवंत आहोत. त्यामुळे लस किती महत्त्वाची आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. सध्या मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांत तसेच बुलढाणा, जळगाव, अहमदनगर, नाशिक या भागातील गंभीर रुग्ण देखील उपचारासाठी औरंगाबादेत येत आहेत, त्यामुळे येथील आरोग्य यंत्रणेवर काही प्रमाणात ताण पडत आहे.

गतवर्षी कोरोना संसर्ग वेगाने पसरत असतांना ज्या उपाययोजना आपण केल्या होत्या त्या यावेळेस आपण केलेल्या नाहीत. कारण कोरोनाचे स्वरूप आपल्याला माहित आहे. तसेच यावेळी या वेळेस आपल्याकडे लस रुपी प्रभावी अस्त्र आहे. तपासण्या, आरोग्य सुविधा, वॉर रुम, सीटी एंट्री पॉइंट तपासणी, तसेच संचारबंदीत विनाकारण फिरणाऱ्यांची तपासणी या गोष्टी आपण करत आहोत. याचाच परिणाम रुग्णसंख्या नियंत्रणात येण्यावर झाला असल्याचे आयुक्त पांडेय यांनी नमूद केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!