Share

‘गोकुळ’चा संचालक व्हायचं असेल तर एका दमात दहा लिटर दूध काढून दाखवा – राजू शेट्टी

Published On: 

कोल्हापूर : गेले काही महिने गोकुळ दूध संघाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापत आहे. सध्याच्या स्थितीत निवडणूक घेण्यास सत्ताधारी गटाचा विरोध होता. मात्र, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या गटाने मात्र निवडणूक व्हावी अशी मागणी उचलून धरली होती. यांनतर, काही दिवसांपूर्वी गोकुळच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

यामुळे इच्छूकांनी संचालकपद मिळवण्यासाठी शड्डू ठोकला आहे. उद्या (१ एप्रिल) उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी या इच्छुकांसाठी तगडं आव्हान दिलं आहे. संचालकपद निवडणुकीतील इच्छूकांनी न थकता १० लिटर दूध काढून दाखवावे अशी अट घालण्याची मागणी केली आहे.

ज्यांना गोकुळची निवडणूक लढवायची आहे, त्यात भाग घ्यायचा आहे, त्यांनी न दमता किमान 10 लिटर दूध काढून दाखवावे अशी एक अट घालावी अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. तसेच, अशी जर अट घातली तरच गोकुळ हा दूध संघ खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचा राहिला असं समजता येईल असंही राजू शेट्टी म्हणाले आहेत.

या निवडणुकीसाठी राजकीय क्षेत्रातील दिग्गजांची पुढची पिढी उतरवली जात असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे जर दूधसंघाच्या संचालकपदी जर विराजमान व्हायचं असेल तर त्या व्यक्तीला किमान १० लिटर दूध काढता यायला हवं असा टोला त्यांनी या राजकीय मातब्बरांना लावल्याचं बोललं जात आहे.

कसा आहे निवडणुकांचा कार्यक्रम –

  • 25 मार्च ते 1 एप्रिल – उमेदवारी अर्ज भरणे
  • 5 एप्रिल – उमेदवारी अर्जाची छाननी
  • 6 एप्रिल – वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे
  • 6 ते 20 एप्रिल – उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी
  • 22 एप्रिल – उमेदवारांना चिन्हांचे वाटप
  • 2 मे – मतदान
  • 4 मे – मतमोजणी

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!