मुंबई : इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) शुक्रवारी सांगितले की, भारतीय क्रिकेट बोर्डाने (बीसीसीआय) कसोटी मालिकेत कोणत्याही प्रकारच्या बदलांची विनंती केलेली नाही. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चे उर्वरित सामने आयोजित करण्यासाठी इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेचे वेळापत्रक बदलण्याची कोणतीही अधिकृत विनंती केलेली नाही, असे ईसीबीने म्हटले आहे.
ब्रिटीश माध्यमांच्या वृत्तानुसार, बीसीसीआयला ऑगस्टपासून सुरू होणारी मालिका बदलण्याची इच्छा आहे, जेणेकरून आयपीएलचे उर्वरित सामने आयोजित केले जाऊ शकतात. परंतु ईसीबीने म्हटले आहे की ते पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार ही मालिका आयोजित करतील कारण भारतीय मंडळाने अद्याप बदल करण्याची अधिकृत विनंती केलेली नाही.
वेळापत्रकात होणाऱ्या संभाव्य बदलाबद्दल ईसीबीच्या प्रवक्त्याने पीटीआयला सांगितले की, ‘आम्ही बीसीसीआय बरोबर नियमितपणे विविध विषयांवर चर्चा करत असतो, खासकरुन जेव्हा कोविड 19 संबंधित आव्हानांचा सामना करत असतो, पण सामन्याच्या तारखांमध्ये बदलासाठी कोणतीही अधिकृत विनंती नाही. आम्ही आधीच्या वेळापत्रकानुसार पाच सामन्यांची मालिका आयोजित करू.
आयपीएल 2021 चे उर्वरित सामने न घेतल्यास बीसीसीआयला 2500 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागेल. लीगच्या जैव-सुरक्षित वातावरणात कोविड 19 प्रकरण आढळल्यामुळे ते पुढे ढकलले गेले. इंग्लंडचे माजी कर्णधार आणि क्रिकेट लेखक मायकेल यांनी ‘टाइम्स’ मधील आपल्या स्तंभात लिहिले आहे की, बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा पूर्ण करण्यासाठी पाचव्या कसोटी सामन्याच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता विचारली आहे.
याबाबत बीसीसीआयशी संपर्क साधला असता, मंडळाच्या सूत्रांनी सांगितले की ते अनेक पर्यायांवर विचार करीत आहेत, परंतु ईसीबीशी अधिकृतपणे संपर्क झाला नाही. बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, ‘आम्ही अनेक पर्यायांवर विचार करीत आहोत, परंतु अद्याप याबाबत अधिकृत विनंती करण्यात आलेली नाही.
ओल्ड ट्रॅफर्डवर कसोटी मालिका संपेल. पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना 10 सप्टेंबरपासून सुरू होईल. भारताने अधिकृत विनंती केल्यास, ईसीबीला पाकिस्तानविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेव्यतिरिक्त ‘द हंड्रेड’ या महत्त्वाकांक्षी स्पर्धेचे वेळापत्रक बदलावे लागेल.
महत्वाच्या बातम्या
- ‘महाराज, मोदींना आग्रा दरबारातील शिवशक्तीचा प्रत्यय पुन्हा दाखवण्याची वेळ आलीये!’
- ‘मुंबईत झाडे पडून २ मृत्यू झाले आहेत, याला महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनाच जबाबदार आहे’
- अभिनेता सैफ अली खानचा आगामी चित्रपट ‘भूत पोलीस’ ओटीटी प्लटफॉर्मवर होणार प्रदर्शित
- ‘मुख्यमंत्री ठाकरेंचा दौरा म्हणजे लिपस्टिक दौरा’, नितेश राणेंची टीका
- ‘फोटोसेशन नव्हे तर मदतीसाठी आलोय’, रत्नागिरी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

