मुंबई : देशातील कोरोनाची व्हायरसची दुसरी लाट हळूहळू मंदावत आहे. नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. गेले दोन दिवस नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचित वाढ झाल्यानंतर आणि पुन्हा एकदा नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे. पण असे असले तरीही दुसऱ्या बाजूला कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका वाढत आहे.
त्याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आता कस्तुरबा रूग्णालयात जिनोम सिक्वेन्सिंग मशीन बसवणार आहे. यामुळे आता कोरोनाचे नवनवीन व्हेरियंट तपासणीसाठी आता नमुने पुण्याच्या एनआयव्हीला पाठवण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई महापालिकेने कस्तुरबा रुग्णालयात डेल्टा प्लस चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी येत्या दोन आठवड्यात कस्तुरबा रुग्णालयात अमेरिकेहून साडेसहा कोटींचे अत्याधुनिक मशीन आणले जाणार आहे.
या ठिकाणी केवळ दोन ते चार दिवसांत डेल्टा चाचणी अहवाल मिळणार आहे. यामुळे पुण्याला चाचणीसाठी सॅम्पल पाठवल्यानंतर रिपोर्टसाठी लागणारे तब्बल दोन महिन्यांचे ‘वेटिंग’ आता संपणार आहे. मुंबईत ‘डेल्टा प्लस’चा केवळ एकच रुग्ण आढळला असून तो बरादेखील झाला आहे. मात्र मुंबई महापालिका आगामी काळात अशा प्रकारच्या वेगवेगळ्या विषाणूंची चाचण्या करण्यासाठी यंत्रणा उभारत आहे. सद्यस्थितीत पालिका ‘डेल्टा प्लस’सारख्या वेगळ्या विषाणूंच्या ‘जिनोम सिक्वेन्स’साठी पुण्याच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी’कडे संशयित रुग्णांची सॅम्पल पाठवली जातात.
महत्वाच्या बातम्या
- नगरमध्ये आघाडीतील बिघाडी चव्हाट्यावर; शिवसेना-राष्ट्रवादीने काँग्रेसला एकटं पाडलं
- पुण्यात उद्यापासून नियम आणखी कडक; जाणून घ्या आज किती रुग्ण संख्या
- औरंगाबादकरांसाठी आनंदाची बातमी; कोरोना रुग्ण संख्येत कमालीची घट
- ‘तो वाघ आमच्या इशाऱ्यावर चालतो’; विजय वडेट्टीवारांचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला
- ‘सत्तेचा माज किती असू शकतो त्याचे हे जिवंत उदाहरण’; भातखळकरांचा संताप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

