मुंबई : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला होता. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होती त्यामुळे आरोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला होता. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत असल्याचे मागील काही दिवसांपूर्वी आपल्याला पाहायला मिळाले होते. अशा सर्व भीषण परिस्थितीतून सध्या संपूर्ण महाराष्ट्र सावरत असताना आता नव्या संकटाने डोक वर काढले आहे.
कोरोनाच्या तिसरा लाटेचा धोका ज्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे आहे त्याचा काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात शिरकाव झाला आहे. कोरोनाच्या ‘डेल्टा व्हेरिएंट’ने भारतात बरीच हानी केली आता डेल्टा प्लस व्हेरिएंट चिंतेचे कारण बनला आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी म्हटले. भारतासह जगात नऊ देशांत सापडलेल्या या व्हेरिएंटचे देशात २२ रुग्ण समोर आले असून त्यात जळगाव आणि रत्नागिरीत १६ सापडले आहेत.
याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे माध्यमांशी बोलत होते. डेल्टा प्लस विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण अधिक गंभीर होतात मात्र, तरीही घाबरण्याचे कारण नाही आहे. ज्या ठिकाणी डेल्टा प्लस विषाणूचे रुग्ण आढळून आले आहेत तेथे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सांगितलं आहे, असं राजेश टोपे म्हणाले. तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता राज्य सरकारने तयारी केली आहे. वैद्यकीय स्तरावर, लहान मुलं यासाठी आयसीयू तयार केले जात आहेत. ऑक्सिजन 3 हजार मेट्रिक टन उपलब्ध करण्याबाबत राज्य शासन प्रयत्न करत आहे, असं राजेश टोपेंनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
- आ. प्रदीप जैस्वाल यांना दिलासा! ‘त्या’ शिक्षेविरोधात जामीन मंजूर
- साऊथॅम्प्टन शमीसाठी खास ; ‘या’ कामगिरीची केली पुनरावृत्त्ती
- जितेंद्र आव्हाडांना ठाकरेंचा ‘दे धक्का!’, टाटा रुग्णालयाला सदनिका देण्याच्या निर्णयाला स्थगिती
- डेल्टा व्हेरिएंटचा धोका! ‘तत्काळ उपाययोजना करा’, केंद्राचा महाराष्ट्रासह तीन राज्यांना इशारा
- आता राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून नगरमध्ये भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार


