Share

आ. प्रदीप जैस्वाल यांना दिलासा! ‘त्या’ शिक्षेविरोधात जामीन मंजूर

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अटक केल्याच्या प्रकरणात त्यांना सोडून देण्याच्या मागणीसाठी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गोंधळ घातल्याप्रकरणी तत्कालीन माजी खासदार व विद्यमान आमदार प्रदीप जैस्वाल यांना सत्र न्यायालयाने ६ महिन्यांची शिक्षा सुनावली होती. दरम्यान जैस्वाल यांनी जामिनासाठी खंडपीठात धाव घेतली असता, न्यायमूर्ती आर. जी. अवचट यांच्या पीठाने १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यासह अटी शर्तींवर नियमित जामिन मंजूर केला.

शहरात निर्माण झालेल्या दंगलसदृश परिस्थितीत क्रांती चौक पोलिसांनी गांधीनगर भागातील दोन शिवसैनिकांना अटक केली होती. त्यावेळी २० मे २०१८ रोजी रात्री अकरा वाजता प्रदीप जैस्वाल पोलिस ठाण्यात आले. त्यांनी पोलिसांना जाब विचारला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना विनाकारण अटक केली, त्यांना तत्काळ जामिनावर सोडा, अशी मागणी करीत जैस्वाल यांनी गोंधळ घालत टेबलावरील काचा फोडत, खुर्च्यांची फेकाफेकी केली होती.

या प्रकरणात सुनावणीअंती सत्र न्यायालयाने कलम ३५३ अन्वये सहा महिन्यांची शिक्षा व अडीच हजार रुपये दंड आणि कलम ५०६ अन्वये सहा महिने व अडीच हजार रुपये अशी शिक्षा सुनावली होती. या प्रकरणात जैस्वाल यांनी ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख यांच्यामार्फत खंडपीठात जामिनासाठी अर्ज सादर केला असता, खंडपीठाने १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यासह अटीशर्तींवर नियमित मंजूर केला. विधिज्ञ देशमुख यांना अॅड. देवांग देशमुख आणि अॅड. गोविंद कुलकर्णी यांनी सहकार्य केले.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!