कोल्हापूर : कोरोनाचा विषाणू हा सध्या अवघ्या जगाची डोकेदुखी ठरला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच संभाव्य हानी टाळण्यासाठी जगभरात सध्या मोठ्याप्रमाणावर लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे जगभरातल्या सर्वच देशांनी आपापल्या देशातील कोरोना लसीकरणाची गती वाढवावी अन्यथा डेल्टा व्हेरिएंट अधिक जीवघेणा ठरु शकतो असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे.
दरम्यान आत कोल्हापूर जिल्ह्यात डेल्टा प्लस वेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. नवी दिल्लीतील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवलेल्या 100 नमुन्यांपैकी 7 नमुने डेल्टा प्लसचे असल्याचे आढळून आल्याने कोल्हापूरमध्ये खळबळ माजली आहे. कोल्हापूर शहरात 3 तर जिल्ह्यात 4 रुग्णांची नोंद झाली आहे. कोल्हापूरमधील जनजीवन पूर्वपदावर येत असताना डेल्टा प्लसचे रुग्ण समोर आल्यानं खळबळ माजली आहे. डेल्टा प्लसच्या रुग्णांमुळे कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेसमोर नव आव्हान उभं राहिलं आहे. कोरोना आणि महापुराला तोंड देणाऱ्या कोल्हापूरसमोर या निमित्तानं नवं संकट उभं राहिले असल्याचे सध्या तरी पाहायला मिळत आहे.
तसेच ऑस्ट्रेलियात देखील कोरोनाचा डेल्टा विषाणू थैमान घालत असल्याचे पाहायला मिळत आहे. याच भीतीमुळे सध्या ऑस्ट्रेलियातील सिडनी, मेलबर्न, कॅनबेरा आणि डार्विन या चारही प्रमुख शहरात कडक निर्बंधांसह लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. सिडनीतल्या प्रत्येक रस्त्यावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कोरोनाचे नियम मोडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पालकमंत्री देसाई यांनी कानडगावच्या ग्रामस्थांना ‘यासाठी’ दिले धनादेश
- सुष्मिता देव यांनी राजीनाम्याच्या निर्णयावर पुनर्विचार करावा’ काँग्रेसची भूमिका
- ‘भावनाताई, चोरी झालेली ७ कोटींची कॅश कोठून आली?’, किरीट सोमय्यांचा सवाल
- हर्षवर्धन पाटलांच्या कन्या अंकिता यांनी घेतली राज्यपालांची भेट, केली ‘ही’ मागणी
- काँग्रेसला धक्का! महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुष्मिता देव यांचा तडकाफडकी राजीनामा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

