Share

हर्षवर्धन पाटलांच्या कन्या अंकिता यांनी घेतली राज्यपालांची भेट, केली ‘ही’ मागणी

Published On: 

मुंबई : माजी कट्टर काँग्रेस नेते पण दोन वर्षांपूर्वी भाजपवासी झालेले हर्षवर्धन पाटील यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली आहे. हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये आल्यापासून अलिप्त आहेत. त्यांच्याकडे भाजपचे ना कुठले मोठं पद आहे ना कुठली जबाबदारी. त्यांच्या भाजप प्रवेशाला आता दोन-अडीच वर्ष उलटून गेली आहेत. पण भाजपमध्ये त्यांना म्हणावे असे स्थान अद्यापही मिळालेले नाहीये. त्यामुळे अमित शाहांच्या भेटीनंतर अनेक राजकीय चर्चांना उधान आले आहे.

त्यानंतर आता हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या तथा पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या व इस्मा नवी दिल्लीच्या कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा अंकिता पाटील यांनी स्वातंत्र्यदिनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. पुणे येथील राजभवन येथे त्यांची भेट झाली. यावेळी अंकिता पाटील यांनी विविध मागण्यांचे निवेदन राज्यपालांना दिले आणि सविस्तर चर्चा केली.

https://www.facebook.com/Ankitaharshvardhanpatil/posts/4055689001223508

या भेटीप्रसंगी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नियुक्ती देणे, अकरावी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात सुनिश्चित धोरण ठरवून योग्य पद्धतीने प्रवेश देणे, इंजिनियरिंग व मेडिकल प्रवेश संदर्भातील पूर्व परीक्षांचे वेळापत्रक सुनिश्चित करून परीक्षा घेणे तसेच संपूर्ण महाराष्ट्रसह पुणे ग्रामीण व विशेष करून इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे सक्तीने केली जाणारी वीज तोडणी थांबवण्याबाबत राज्यपालांना अंकिता पाटील यांनी विनंती केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!