Share

‘भावनाताई, चोरी झालेली ७ कोटींची कॅश कोठून आली?’, किरीट सोमय्यांचा सवाल

Published On: 

मुंबई : वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून शाब्दिक वाद सुरू आहे. नुकतंच सोमय्या यांनी पुण्याच्या मावळमध्ये पत्रकार परिषदेत भावना गवळी यांच्यावर आरोप केले होते. गवळी यांनी केंद्र, राज्य सरकारसह बँकेचे रक्कम लाटली असा आरोप सोमय्यानी केला होता. हा गैरव्यवहार कसा केला, हे सोमवारी मुंबईत पुराव्यासह समोर आणणार असं ही सोमय्यानी जाहीर केले होते.

त्यानंतर आता भावना गवळी यांच्या कार्यालयातून ७ कोटींची कॅश चोरीला गेल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. यावरून सोमय्या यांनी गवळी यांच्यावर टीका केली आहे. ‘भावना ताई, ७ कोटींची कॅश आली कुठून?, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

किरीट सोमय्या यांनी पुण्यात गवळी यांच्यावर आरोप केल्यानंतर आता ट्वीट करत एक नवा आरोप केला आहे. भावना गवळी यांच्या कार्यालयातून पहाटे ५ वाजता ७ कोटी रोख नगदी चोरी? असा सवाल त्यांनी ट्वीट करत केला आहे. शिवसेना भावना गवळी त्यांचा कार्यालयातून, त्यांचा उपस्थितीत ७ जुलै २०१९ रोजी सकाळी ५ वाजता ७ कोटी नगदी रोख ११ लोकांनी चोरले अशी तक्रार १२ मे २०२० रोजी वाशीम पोलीस ठाण्यात केली आहे. एवढी रोख रक्कम आली कुठून? असा सवाल सोमय्या यांनी केला आहे.

भावना गवळी यांनी वाशिम पोलिस ठाण्यात कार्यालयातून ७ कोटी रुपयांची रक्कम पहाटे ५ वाजता चोरीला गेल्याची तक्रार केली. यानंतर पोलिसांनी प्राथमिक माहिती अहवालाची नोंद केली. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!