Share

मुंबई : डिलिव्हरी बॉयला मारहाण, शिवसेना शाखाप्रमुखासह इतरांवर गुन्हा

Published On: 

मुंबई – येथील समतानगर परिसरात शिवसैनिकांकडून एका ई कॉमर्स कंपनीच्या डिलिव्हरी बॉयला गंभीर मारहाण झाल्याची घटना पुढे येत आहे. राहुल शर्मा असे डिलीव्हरी बॉयचे नाव असून मारहाणीत त्याच्या डोक्याला 6 टाके पडल्याची माहिती आहे. या प्रकरणात स्थानिक शिवसेना शाखा प्रमुख आणि इतर काही शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पीडित डिलिव्हरी बॉयने दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. समतानगर परिसरात या आधीही शिवसैनिकांकडून एका माजी सैनिकाला मारहाण झाल्याची घटना घडली होती. त्या घटनेनंतर आता पुन्हा एकदा समतानगर येथील शिवसैनिक चर्चेत आले आहेत.

दरम्यान, काल घडलेल्या या प्रकारानंतर मुंबई पोलिसांनी मंगळवारी कांदिवलीमधील शिवसेनेच्या चार कार्यकर्त्यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये शिवसेनेच्या शाखाप्रमुखाचाही समावेश आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये एकूण सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून दोनजण अद्याप फरार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका ई कॉमर्स साइटसाठी काम करणारा हा तरुण मंगळवारी पोईसरमध्ये डिलेव्हरीसाठी गेला असता जोरदार पाऊस पडू लागला. त्यावेळी त्याने पोईसरमधील शिवाजी मैदान येथे असणाऱ्या शिवसेनेच्या कार्यालायसमोरील छपराखाली आसरा घेतला,” असं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शर्मा शिवसेना कार्यालयाच्या बाहेरील बाजूस उभा असतानाच शिवसेना कार्यकर्ता असणाऱ्या चंद्रकांत निनवे यांनी शर्माकडे असणाऱ्या पार्सवर पाय ठेवला. “शर्माने निनवे यांना त्या वस्तूंना पाय लावू नका, असं सांगितलं असता त्यांनी शर्माला शिवागाळ करण्यास सुरुवात केली. या शाब्दिक बाचाबाचीचं रुपांतर हाणामारीमध्ये झालं आणि निनवे यांनी अन्य पाच शिवसैनिकांच्या मदतीने शर्माला मारहाण केली,” अशी माहिती पोलीसांनी दिलीय. शर्माला डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!