दुबई : दिल्लीने सनरायजर्स हैदराबादला पराभूत करून अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे, तर आता दिल्ली आणि मुंबई आयपीएलचे विजेतेपद मिळवणायसाठी भिडणार आहेत. यपीएलच्या १३ हंगामांच्या इतिहासात पाहिले तर, दिल्लीची अंतिम सामन्यात मजल मारण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापुर्वीच्या एकाही हंगामात दिल्लीने ही मजल माजली न्हवती . तर दुसऱ्या बाजूला मुंबई संघाची अंतिम सामन्यात मजल मारण्याची ही सहावी वेळ आहे. आय पी एल विजेटेपद जिंकण्यासाठी आता हे दोन्ही संघ सज्ज झाले आहेत.
या आयपीएलमध्ये चुरशीचं वातावरण पाहायला मिळालं, अनेक खेळाडूंना दुखापतीमुळे तर काहींना वैयक्तिक कारणांमुळे आयपीएल अर्ध्यात सोडून घरी परतावं लागलं होतं. यंदाच्या मोसमात दिल्ली कॅपिटल्सने आपला चांगलाच दबदबा निर्माण केला होता. दिल्ली टीमच्या या आयपीएल मधील चांगल्या कामगिरीचे अनेक क्रिकेटप्रेमी भरभरून कौतुक देखील केले.
१० नोव्हेंबरला आता मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली संघात आयपीएल २०२०चा अंतिम सामना रंगणार आहे. सुरुवातीला आयपीएल होईल की नाही याबद्दल शंका उपस्थित करण्यात येत होती कारण कोरोनामुळे परिस्थिती बिघडत चालली होती. सामने सुरू असताना प्रेक्षकांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून विनाप्रेक्षक सामने खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर्षी आयपीएल भारतात झाली नसून UAE मध्ये चालू होती, विना प्रेक्षक रंगलेली ही २०२०ची आयपीएल ट्रॉफी कोणता संघ घेऊन जाणार हे पाहण्याजोगे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- आनंदाची बातमी : राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या एक लाखाच्या आत
- सनरायजर्स हैदराबादावर विजय मिळवत दिल्ली थेट फायनलमध्ये
- साधा प्रवक्ता बनवला असता तरी भाजपला मान वर काढू दिली नसती; शिवसेना नेत्याने व्यक्त केली खदखद
- …त्यामुळे यंदा दिवाळी साजरा न करता ‘त्यांच्या’ नावाने शिमगा साजरा करा!
- कोरोना टाळण्यासाठी नागरिकांनी जीवनशैली बदलण्याची आवश्यकता – उद्धव ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

