🕒 1 min read
दिल्ली : दिल्ली येथे ५ मे रोजी छत्रसाल स्टेडियममध्ये कुस्तीपटुंच्या दोन गटांमध्ये मोठा दंगा झाला होता. या वेळी कुस्तीपटुंच्या झालेल्या जबरदस्त हाणामारी झाली होती. या हाणामारीत पाच जण जखमी झाले होते. तर एका कुस्तीपटुचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यु झाला होता. याप्रकरणी मॉडेल टाऊन पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यात भारताकडुन दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटु सुशील कुमार याचे नाव देखील समावीष्ट आहे. छत्रसाल स्टेडियममध्ये झालेल्या चकमकीत कुस्तीपटूच्या हत्येच्या आरोपात सुशील कुमार फरार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. दिल्ली येथील मॉडेल टाऊन पोलीस स्थानकातील पोलिसांनी अनेक ठिकाणी शोध घेतला, परंतु तो काही पोलिसांच्या हाती लागला नाही. आता पोलिस दिल्ली एनसीआरसह इतर राज्यात देखील त्याचा शोध घेत आहे. पीडितांनी सुशील घटनास्थळी उपस्थित होता असा आरोप केला आहे.
मंगळवारी व बुधवारी मध्यरात्री छत्रसाल स्टेडियमवर ही घटना घडली. या घटनेत २३ वर्षीय ज्युनियर कुस्तीपटू सागर राणा याचा उपचारादम्यान मृत्यू झाला. तर २ कुस्तीपटू गंभीर जखमी आहेत. दिल्ली पोलिस दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सुशील कुमार हा या हत्येत समाविष्ट असल्याचा पुरावा त्यांच्याकडे आहे. सुशील कुमारचे सासरे सतपाल सिंग आणि १० ते १२ लोकांना पोलिसांनी विचारपुस केली तेव्हापासून या प्रकरणात सुशील कुमारचे नाव आले आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी प्रिन्स दलाल यांच्या फोनमध्ये त्यांना घटनेचा एक व्हिडिओ सापडला असून त्यात सर्व हल्लेखोरांचे चेहरे दिसून येत आहेत. ”
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबई इंडियन्सचा खेळाडू पियुष चावलाच्या वडिलांचे कोरोनाच्या संसर्गामुळे दुर्दैवी निधन
- CSK पाठोपाठ सनरायझर्स हैदराबादनेही केली 30 कोटींची मदत
- आसामच्या मुख्यमंत्रिपदी हेमंत बिस्व सरमा, शपथग्रहण सोहळा संपन्न
- लता मंगेशकर यांनी जम्बाे कोविड रुग्णालयाच्या कामाचे पत्र लिहीत केले कौतुक
- ‘माझ्याकडे नवरा आहे…’; ट्विंकलने युजरला दिले गमतीशीर उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
