मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चेन्नई सुपर किंग्ज संघ (सीएसके) ने कोविड 19 साथीच्या विरूद्ध लढा देण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. तीन वेळा आयपीएल चॅम्पियन सीएसकेने तमिळनाडूमधील कोरोना रूग्णांसाठी 450 ऑक्सिजनची व्यवस्था केली आहे. चेन्नई सुपर किंग्ज क्रिकेट लिमिटेडचे संचालक आर. श्रीनिवासन यांनी शनिवारी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन यांच्याकडे ऑक्सिजन केंद्रे सुपूर्द केली. यावेळी तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रूपा गुरुनाथ उपस्थित होते.
कोविड -19 मदत कार्यांशी संबंधित भुमिका ट्रस्ट ही स्वयंसेवी संस्था सीएसकेला ऑक्सिजन केंद्राच्या वितरणाची व्यवस्था करण्यात मदत करीत आहे. तर सनरायझर्स हैदराबादनं सोमवारी दुसऱ्या लाटेत होरपळलेल्यांसाठी 30 कोटींची मदत जाहीर केली.
Sun TV (SunRisers Hyderabad) is donating Rs.30 crores to provide relief to those affected by the second wave of the Covid-19 pandemic. pic.twitter.com/P6Fez9DuLo
— SunRisers Hyderabad (@SunRisers) May 10, 2021
कोविड १९ रिलीफ मदतीसाठी अनुष्का आणि विराट यांनी केट्टो (Ketto) वर एक मोहीम सुरू केली होती. त्यावर प्रत्येकाने जमेल तेवढ्या पैशाचे योगदान करावे असे आवाहन देखील केले होते. कोणतीही रक्कम जीव वाचवण्यासाठी कमी नाही. परंतु या संघर्षासाठी आम्हाला आपल्या मदतीची आवश्यकता आहे. या मोहिमेत सर्वांना सहभागी होण्याची विनंती अनुष्का आणि विराट यांनी केली होती.
महत्वाच्या बातम्या
- ‘..तर मग मोदी सरकार काय करतंय?’; बाळासाहेब थोरातांचा सवाल
- श्रीलंका दौऱ्यावर नसणार विराट-रोहित
- मायदेशी परतल्यानंतर बोल्टची भावुक पोस्ट, भारतात पुन्हा परतण्याची केली इच्छा व्यक्त
- ‘संजय राऊत काय बोलतात याकडं आम्ही लक्ष देत नाही, अन् सामना देखील वाचत नाही’
- खरं तर माझ्या वडिलांचा जीव कोरोना लसीमुळेचं वाचला ; अश्विनने सांगितला भावूक प्रसंग

