Share

मुंबई इंडियन्सचा खेळाडू पियुष चावलाच्या वडिलांचे कोरोनाच्या संसर्गामुळे दुर्दैवी निधन

Published On: 

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. यादरम्यान भारतात सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्याने स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करण्यात आली. स्पर्धा रद्द झाल्यानंतर स्पर्धेत सहभागी झालेले अनेक खेळाडू स्वगृही परतले.

आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा खेळाडू चेतन सकारियाच्या वडिलांचे रविवारी ९ मे रोजी कोरोना संसर्गामुळे दुर्दैवी निधन झाले. हे वृत्त ताजे असतानाच मुंबई इंडियन्सचा खेळाडू पियुष चावलाच्या वडिलांचे आज म्हणजे सोमवारी १० मे रोजी निधन झाले आहे. पियुष चावलाचे वडिल प्रमोद कुमार चावला यांना काही दिवसापुर्वी कोरोनाची लागण झाली होती. वडिलांच्या निधनाची बातमी स्वत: चावलाने सोशल मीडीयाच्या माध्यमातुन दिली आहे.

https://www.instagram.com/p/COrb35zlwud/

पियुष चावलाने इन्स्टाग्राम या सोशल मीडीयावर पोस्ट करत लिहीले आहे की,’मोठ्या जड अंत:करणाने मला जाहिर करावे लागत आहे की माझे वडिल प्रमोद कुमार चावला यांचे १० मे २०२१ रोजी निधन झाले आहे. त्याना कोरोनाची लागण झाली होती. या संकटाच्या काळात तुम्ही दिलेला पाठिंबा आणि प्रार्थनेचे मी स्वागत करतो. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.’ असा संदेश ट्विट करत पियुष चावलाने त्याच्या वडिलांचा फोटो पोस्ट केला आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!