मुंबई: सर्व जगाचा थरकाप उडवणारे २०१२ सालचे निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरण या प्रकरणानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात देश ढवळून निघाला. महिला अत्याचाराविरोधात आंदोलने झाली. तर गेल्या काही वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर निर्भयाला अखेर न्याय मिळाला. हे प्रकरण पहिल्यांदा ‘दिल्ली क्राइम’ या नेटफ्लिक्सवरील वेबमालिके तून लोकांसमोर आले. भारतीय-कॅ नेडियन दिग्दर्शिका रिची मेहता यांनी दिग्दर्शित के लेल्या ‘दिल्ली क्राइम’ या वेबमालिके ला सर्वोत्कृष्ट नाटय़ मालिके साठीच्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
एमी पुरस्कार मिळवणारी ‘दिल्ली क्राइम’ ही पहिली भारतीय वेबमालिका ठरली आहे. गेल्या वर्षी ‘सेक्रेड गेम्स’ या नेटफ्लिक्सवरील भारतीय वेबमालिकेला एमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते, मात्र त्यांना पुरस्कारावर मोहोर उमटवता आली नव्हती. या वेळी करोनामुळे एमी पुरस्कार सोहळा ऑनलाइन पार पडला. अभिनेता रिचर्ड काइंड यांनी या सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.
‘दिल्ली क्राइम’ या वेबमालिकेत दिल्ली पोलिसांच्या दृष्टिकोनातून हे सारे प्रकरण उलगडण्यात आले आहे. या वेबमालिके च्या वेगळ्या मांडणीमुळे समीक्षक आणि प्रेक्षकांकडूनही मालिके ला चांगला प्रतिसाद मिळाला होता. ‘दिल्ली क्राइम’च्या दिग्दर्शिका रिची मेहता यांनी हा पुरस्कार पुरुषांकडून होणाऱ्या अन्यायाचा सामना करणाऱ्या जगभरातील स्त्रियांनाच नाही तर समस्या सोडवण्याचे आव्हान पेलणाऱ्या स्त्रियांसाठीही समर्पित आहे, अशी भावना पुरस्कार सोहळ्यात बोलून दाखवली.शेफाली शहा, आदिल हुसैन, राजेश तेलंग अभिनीत ‘दिल्ली क्राइम’ या वेबमालिके ला एमी पुरस्कार मिळाल्याबद्दल बॉलीवूडमधील कलाकार-दिग्दर्शकांनीही समाजमाध्यमांवरून शुभेच्छांचा वर्षांव केला आहे. अ;ॅमेझॉन प्राइमवरील ‘फोर मोर शॉट्स’ या वेबमालिके लाही सर्वोत्कृष्ट विनोदी वेबमालिका विभागात नामांकन मिळाले होते, तर ‘मेड इन हेवन’ वेबमालिके तील अभिनेता अर्जुन माथुर याला याच पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट कलाकार म्हणून नामांकन मिळाले होते.
महत्वाच्या बातम्या
- ठाण्यात पोलिसांनी मोर्चा रोखल्यानंतर मनसेचा राडा; मनसे नेते ताब्यात
- लँडलाइन फोनवरून मोबाइलवर कॉल करताना आता ‘हे’ करणे अनिवार्य असेल
- वेळ पडल्यास ओबीसींच्या मागण्यासाठी राज्यभर महामोर्चे काढू : वडेट्टीवार
- ‘ते’ पुस्तक पूर्णपणे देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूचं आहे : नवाब मलिक
- मोदींनी दिएगो मॅराडोनाच्या निधनाबद्दल व्यक्त केले दुःख; म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

