🕒 1 min read
नांदेड : नांदेडमधील देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर आज मतमोजणी पार पडली आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. या निवडणुकीत ६५ टक्के मतदान झाले होते. या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे.
पहिल्या फेरीपासून मिळवलेली आघाडी कायम ठेवत कॉंग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी दणदणीत विजय मिळवला. जितेश यांनी तब्बल ४१ हजार ९३३ मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे जितेश यांच्या विजयी मतांची आघाडी त्यांचे वडील रावसाहेब अंतापूरकर यांनी २०१९ विधानसभेच्या आघाडीपेक्षा दुप्पट आहे. काँग्रेसच्या या विजयानंतर काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रात यावेळी काँग्रेसला पूर्वीपेक्षा जास्त मतदान मिळाले. राजस्थानमधील दोन्ही जागा काँग्रेसने जिंकल्या. हा विजय काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा विजय आहे. भाजपने खालची पातळी गाठून प्रचार केला होता. त्याला देगलूर बिलोलीच्या जनतेने साथ दिली नाही.आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन निवडणूक लढवली. हा विजय लोकांचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली. काँग्रेसने बिलोली देगलूर विधानसभा पोटनिवडणूक मोठ्या फरकाने जिंकली. त्यानिमित्त ते नांदेडमध्ये बोलत होते.
भाजपने खालची पातळी गाठून प्रचार केला होता. त्याला देगलूर बिलोलीच्या जनतेने साथ दिली नाही. आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन निवडणूक लढवली. हा विजय लोकांचा विजय आहे. शंकरराव चव्हाण यांच्या पुन्याईला लोकांची नेहमीच साथ मिळालेली आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला पूर्वीपेक्षा या वेळेला जास्त मतदान मिळालं. राजस्थानमधील दोन्ही जागा काँग्रेसने जिंकल्या. हा विजय काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा विजय आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘नबाब मलिक हा जावयामुळे वेडा झालेला जगातला पहिला सासरा’
- माणूस एकदम भला आहे, पण कधीच खरं बोलत नाही; भातखळकरांचा राऊतांना टोला
- मी दाखवतो कोण पार्ट्या करतात; नितेश राणेंचा ठाकरेंवर निशाणा
- ‘अहो राऊत, परमबीर सिंहांना अजून तुम्ही पदावरून दूर ही केलं नाही, अन्..’, भाजपचा घणाघात
- ‘ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड करण्यासाठी गुन्हे शाखेत आणि EOWला मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश द्यावेत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
