मुंबई : गेल्या आठवड्यात काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देशभरातील विरोधकांची एक महत्त्वाची बैठक बोलावली. यावेळी स्वातंत्र्य चळवळीने देशाला दिलेली मूल्ये मानणारे सरकार २०२४ च्या लोकसभा निवडणुकांनंतर सत्तेवर आणायचे आहे, असा निर्धार करून बिगरभाजप पक्षांनी आपली धोरणे आखावीत, असे आवाहन सोनिया गांधी यांनी केले आहे. हे ध्येय आपण एकजुटीने साध्य करू. त्याशिवाय आपल्याकडे अन्य पर्यायही नाही, असेही त्या म्हणाल्या. यावर आज ‘सामना’मधून भाष्य करण्यात आले आहे.
शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले की, ‘विरोधी पक्षांची एक मोट बांधून २०२४ च्या निवडणुकांना सामोरे जावे, असे विचार सुरू झाले आहेत. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पुढाकाराने देशातील विरोधी पक्षांची एक बैठक पार पडली. काँग्रेससह १९ राजकीय पक्ष या बैठकीत सामील झाले. १९ पक्ष एकत्र आले व त्यांनी विरोधी पक्षांची ‘मोट’ बांधण्यासंदर्भात चर्चा केली. त्या चर्चेतून कोणते फळ हाती लागले हे महत्त्वाचे. लोकशाही आहे म्हटल्यावर चर्चा तर होणारच, पण फक्त ‘चर्चा पे चर्चा’ नकोत तर देशासमोर एक ठोस कार्यक्रम घेऊन जाणे गरजेचे आहे,” असं स्पष्ट मत शिवसेनेने अग्रलेखातून मांडले आहे.
‘२०२४ चे लक्ष्य’ वगैरे ठीक आहे, पण मोदी-शहांप्रमाणे हातचलाखीचे काही प्रयोग विरोधकांनाही करावेच लागतील. ‘मोदी नामा’ची जादू उतरली आहे. त्यामुळे २०२४ चा जय-पराजय हा हातचलाखीच्या खेळावरच ठरेल. त्याची तयारी, रंगीत तालीम करावी लागेल, नाहीतर जन आशीर्वादाच्या ‘जत्रा’ लोकांना गुंगीचा मंत्र देऊन पुढे निघतील’ असा इशारा शिवसेनेने विरोधकांना दिला आहे.
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्यासाठी आकाश-पाताळ एक केले. मोदींची सभा व शहांचे निवडणूक व्यवस्थापन म्हणजे विजय पताका फडकण्याची खात्रीच, हा भ्रम ममता बॅनर्जींनी धुळीस मिळवला. मोदींच्या १९ सभा होऊनही प. बंगालात ममतांचाच झेंडा फडकला व शहांचे सर्व राजकीय नियोजन, आर्थिक व्यवस्थापन पराभूत झाले. म्हणजेच मोदी-शहा यांचा पराभव होऊ शकतो. लोकशाही आहे म्हटल्यावर चर्चा तर होणारच, पण फक्त ‘चर्चा पे चर्चा’ नकोत तर देशासमोर एक ठोस कार्यक्रम घेऊन जाणे गरजेचे आहे, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांच्या आयोजित १९ राजकीय पक्षांच्या बैठकीवर आपले व्यक्त केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनला अगोदर प्राधान्य- रावसाहेब दानवे
- ‘पुजारा किंवा रहाणेच्या जागी सुर्यकुमारला तिसऱ्या कसोटीत संधी द्यावी’,- फारुख इंजिनीयर
- गुन्हे मागे ; बैलगाडा मालकांनी जल्लोषात केला गृहमंत्री वळसे पाटलांचा सत्कार
- मोठी बातमी : मंत्रालयाबाहेर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी सुभाष जाधव यांचा मृत्यू
- शहरात लसीकरणाला प्रतिसाद ; पावणे सात लाख जणांचे लसीकरण


