🕒 1 min read
औरंगाबाद : कोरोनाच्या काळात गोरगरिबांना पोटभर जेवण मिळावे या उदात्त हेतूने शिवभोजनाची सुरुवात करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अत्याधुनिक सुविधा असलेल्या नव्या शिवभोजन वाहनाचे लोकार्पण शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते मंगळवारी (दि.२७) अभिनय टॉकीज समोर करण्यात आले.
या कार्यक्रमांचे आयोजक शिवसेना उपशहरप्रमुख राजेंद्र दानवे, रवींद्र लोढा यांनी केले होते. या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते खिंवसरा, कडवा पाटीदार समाजाचे बाबूभाई पटेल, जैन कॉन्फरन्सचे मदनलाल लोढा, शहरप्रमुख विजय वाघचौरे आदिंची उपस्थिती होती. शिवभोजनामार्फत गोरगरिबांना पोटभर अन्न मिळावे आणि त्यांचा आशिर्वाद राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मिळून य महाराष्ट्राची सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने प्रगती व्हावी अशा शुभेच्छा व्यक्त करत शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी शिवभोजनच्या अद्यावत वाहन लोकार्पण केले.
शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे पुढे बोलतांना म्हणाले की, निवडणूक होण्या अगोदर शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात कोणताही गोर-गरीब उपाशी राहू नये असे सांगत शिवभोजन सुरू करण्याबाबत शिवसैनिकाना आदेश दिले होते. या आदेशानुसार २७ जुलै २०१७ या वर्षी शिवभोजनची पहिली सुरुवात औरंगाबाद शहरात झाली.
या शिवभोजनाची सुरुवात केल्याने अनेक गोर-गरिबांना पोटभर जेवणाचा आधार मिळाला. कोरोनाच्या संसर्ग काळातही ही सेवा अविरतपणे शिवसैनिकांनी सुरूच ठेवली. शिवभोजनाचा लाभ प्रत्येक गरजू माणसाला घेता यावा यासाठी अत्याधुनिक सुविधा असलेल्या वाहनाचे आज लोकार्पण केले असून शिवभोजनाचा लाभ गोर-गरीब, कामगार, वाहनचालक, हमाल, मजूर यांनी घ्यावा असे आवाहन आमदार अंबादास दानवे यांनी केले.
महत्त्वाच्या बातम्या
- पुणे शहराच्या कोरोना रुग्णसंख्येत वाढ, तर कोरोनामुक्तांची संख्या देखील अधिक
- औरंगाबाद-अहमदनगर रेल्वेमार्गाचे होणार सर्वेक्षण, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची पत्राद्वारे खा. जलील यांना माहिती!
- ममता बॅनर्जी यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
- कोरोनाचे संकट संपल्यानंतर वेरुळ महोत्सवाचे नियोजन करण्यावर लक्ष, अमित देशमुख यांचे आश्वासन
- उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देणं पंतप्रधान मोदींना जमलं मात्र मित्र पक्षाच्या राहुल गांधींना का नाही जमलं ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
