Share

मुंबईचे वाटोळे करण्याचे पाप गेल्या अनेक वर्षात फक्त शिवसेनेनेच केले : भाजपा

Published On: 

मुंबई  – गेली सुमारे २४ वर्षे मुंबई महापालिकेवर शिवसेनेने फक्त सत्तेचा उपभोग घेतला आहे. वर्षोनुवर्षे सत्तेवर असूनही आज मुंबईचे प्रश्न मात्र कायम आहेत. मग ते पाणी तुंबण्याचा विषय असो वा नालेसफाईचा विषय. मुंबईत कच-याचा प्रश्नही आजही कायम असून मुंबईत अनधिकृत बांधकांमाचाही सुळसुळाट झाला आहे.या मुंबईचे वाटोळे करण्याचे पाप गेल्या अनेक वर्षात फक्त शिवसेनेनेच केल्याची जोरदार टिका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी काल केली.

विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी वसंत स्मृती भवन, दादर येथे आयोजित भारतीय जनता पार्टी मुंबई कार्यकारणी बैठकीला उपस्थित राहून मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, गेली २४ वर्षे मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. साधारण दरवर्षी सुमारे ३० ते ३३ हजार कोटीचा पालिकेचा अर्थसंकल्प आहे. गेल्या २४ वर्षात पालिकेचे हजारो कोटीचे अर्थसंकल्प झाले पण मुंबापुरीला पाणी तुंबल्याच्या प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. पूर्णपणे नालेसफाई होत नाही. आजही मॅनहोलमधून लोक वाहून जात आहे. घनकचरा व्यवस्थापनाचा दीड ते दोन हजार कोटीचा प्रकल्प असून आजही मुंबईत ठिकठिकाणी कचरा दिसून येत आहे अशी टीकाही त्यांनी केली.

यावेळी बोलताना दरेकर यांनी सांगितले की, मुंबईतील मराठी शाळांची दुरावस्था होत आहे. मुंबईतील ज्या मराठी शाळा बंद पडत आहे ते शिवसेनेचे पाप आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विसर शिवसेनेला पडला आहे. सत्तेसाठी शिवसेना विविध विचारधारे बरोबर गेली. हे मुंबईतील मराठी माणसालाच काय पण कडवट शिवसैनिकांनाही हे सहन झाले नाही. त्यामुळे मुंबईतील मराठी माणूस आता निवडणुकांची वाट पाहत आहे, जेव्हा फेब्रुवारी मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका येतील, तेव्हा महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला.

दरेकर म्हणाले की, मोदी यांच्यासारखे नेतृत्व देशाला लाभले आहे. देवेंद्रजी फडणवीस यांचे महाराष्ट्राला मार्गदर्शन आहे.त्यामुळे आगामी महापालिकेत निवडणुकीत गेल्या पाच वर्षांत भाजपा सरकारने जनतेमध्ये कमविलेल्या विश्वासाला जनता नक्कीच साथ देईल व अहंकारने भरलेले ठाकरे सरकार खाली खेचल्याशिवाय राहणार नाही असा ठाम विश्वासही दरेकर यांनी व्यक्त केला.

या बैठकीला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेन्द्र जी फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे, मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा, संघटन सरचिटणीस मा. विजयराव पुराणिक, आमदार अतुल भातखळकर, खासदार गोपाळ शेट्टी, खासदार मनोज कोटक,खासदार सय्यद जाफर, आमदार  निलेश राणे, कालिदास कोळंबकर, कॅप्टन. तामिळ सेलवन, अमित साटम, सुनील राणे,प्रसाद लाड, योगेश सागर, पराग आळवणी,भाजपा महाराष्ट्र निवडणूक संयोजक सुनील कर्जतकर,मुंबई महामंत्री संजय उपाध्यय, मुंबई भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष तेजिंदर तिवाना, आदि मुंबई पदाधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!