मुंबई : टाळेबंदीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना आता ठाकरे सरकारने वाढीव वीजबिलात कोणत्याही प्रकारची सवलत देण्यास नकार दिला आहे. वीज ग्राहकांना वीज बिलात सवलत मिळणार नसल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी महावितरणने वीज बिल वसुलीबाबत आदेश काढले होते, त्यावर बोलताना ऊर्जामंत्र्यांनी हे स्पष्ट केलं आहे.
महाविकास आघाडीने वीजबिल माफीवरून युटर्न घेतल्यामुळे जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप करत भाजपसह सर्वच विरोधी पक्षांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. आता भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील ट्विट करत सरकारला लक्ष्य केलं आहे. “या महाविकास आघाडी सरकारने ‘नाईटलाईफ’ जास्तच मनावर घेतले आहे अस दिसते.. विज बिल इतके हातात दिले की, कोणच भरणार नाही.. मग काय अंधारच अंधार.. आणि मग.. पेंग्विन गॅंगची पार्टी सुरु!!!” अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी केली आहे.
या महाविकास आघाडी सरकारने "NIGHTLIFE” जास्तच मनावर घेतले आहे अस दिसते..
विज बिल इतके हातात दिले की, कोणच भरणार नाही.. मग काय अंधारच अंधार..
आणि मग..
Penguin Gang ची पार्टी सुरु!!!— Nitesh Rane (@NiteshNRane) November 19, 2020
दरम्यान, राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलातून दिलासा मिळणार नाही, मीटर रिडींगप्रमाणे आलेली बिलं ग्राहकांनी भरलीच पाहिजेत असं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. ६९ टक्के वीज बिल वसुली पूर्ण झाली आहे, आता सवलतीचा विषय बंद झाला आहे. महावितरण ६९ हजार कोटीच्या तोट्यात आहे, आम्ही आता कर्ज काढू शकत नाही. महावितरणला आता वीज बिल वसुलीचे आदेश देण्यात आले आहेत असं देखील राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- मंत्री गुलाबराव पाटील ‘या’ नवसाची पूर्ती करण्यासाठी आले शिर्डीच्या साई दरबारी!
- शंभर पिढ्या जरी उतरल्या तरी मुंबई महापालिकेवर भगवा फडकणारच; संजय राऊतांचा भाजपवर पलटवार
- कौतुक आणि टीकेचं मी स्वागत करते,तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन मी पुन्हा येईन : अमृता फडणवीस
- वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर जनतेला दिलासा देण्यासाठी रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल : मनसे
- अनुदानाच्या श्रेयासाठी पाथर्डी तालुक्यात राष्ट्रवादी-भाजप-शिवसेनेत रस्सीखेच!


