अयोध्या – भारताला हिंदुराष्ट्र घोषित करण्याची मागणी हिंदुत्ववादी नेहमीच करत असतात. तशी ही मागणी जुनी आहे मात्र आता ही मागणी पुन्हा एकदा करण्यात आल्याने या मागणीची सध्या जोरदार चर्चा होताना पाहायला मिळत आहे. जगदगुरु परमहंस आचार्य महाराज यांनी मंगळवारी त्यांनी अयोध्येमध्ये भारताला गांधी जंयतीपर्यंत हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करावं अशी मागणी केलीय. तसेच केंद्र सरकारने असं केलं नाही तर आपण जलसमाधी घेऊ असंही महाराजांनी म्हटलं आहे.
Ayodhya | I demand that India should be declared a ‘Hindu Rashtra’ by Oct 2 or else I'll take Jal Samadhi in river Sarayu. And Centre should terminate nationality of Muslims & Christians: Jagadguru Paramhans Acharya Maharaj (28.09) pic.twitter.com/QMAIkd6tLZ
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) September 29, 2021
जगदगुरु परमहंस आचार्य महाराजांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही मागणी केलीय. “माझी मागणी आहे की २ ऑक्टोबरपर्यंत भारताला ‘हिंदू राष्ट्र’ म्हणून घोषित करावं, नाहीतर मी शरयू नदीमध्ये जलसमाधी घेईल. तसेच केंद्र सरकारने मुस्लीम आणि ख्रिश्चन लोकांचं नागरिकत्व काढून घ्यावं,” असं जगदगुरु परमहंस आचार्य महाराज यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, या मागणीमुळे आणि सरकारला दिलेल्या इशाऱ्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. काहींनी जगदगुरु परमहंस आचार्य महाराज यांच्यावर टीका केली आहे तर काहींनी या मागणीला विरोध दर्शविला आहे. सध्या सोशल मिडीयावर या बाबत मोठ्याप्रमाणात चर्चा होताना दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मांजरा नदीच्या पुरात अडकलेल्या तिघांना हेलिकॉप्टरच्या सह्याने सुखरूप बाहेर काढले
- भुजबळांविरोधातली याचिका मागे घ्या; शिवसेना आमदाराला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीची धमकी
- किती नौटंकी करणार शिवसेना? किती चुना लावणार लोकांना? भाजप आमदाराने उडवली खिल्ली
- ‘ईडीला उत्तरं देणं ही माझी जबाबदारी मात्र कुणा वैयक्तिक व्यक्तीला उत्तर देण्यास मी बांधील नाही’
- नवज्योत सिंग सिद्धू यांच्या राजीनाम्याबाबत मला काहीच माहिती नाही – चरणजीतसिंग चन्नी


