Share

महाराष्ट्र ‘ओपनिंग अप’ कडे नेण्याचा निर्णय ; मुंबईत लोकल ट्रेन सर्वांसाठी सुरू होणार?

Published On: 

मुंबई : गेल्यावर्षी पासून कोरोना रोगाने राज्यासह देशभरात हाहाकार माजवला आहे. दुसऱ्या लाटेत सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून आले. देशातील सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्र अग्रस्थानी असून कोरोना मृतांचा आकडा देखील अधिक आहे.

मार्च महिन्याच्या अखेरीस संपूर्ण राज्यात पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. यानंतर, विविध जिल्ह्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्यास सुरुवात झाली होती. मात्र, कोरोना नियमांचे न होणारे योग्य पालन आणि वाढती रुग्णसंख्या यामुळे संपूर्ण राज्यात पुन्हा तिसऱ्या स्तराचे नियम लावण्यात आले होते. आता पुन्हा एकदा राज्यात अनलॉकला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून लोकल ट्रेनबाबत काय निर्णय होणार? याची उत्सुकता सर्वसामान्य मुंबईकरांना लागलेली आहे. दरम्यान सध्या मिळालेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यांपासून निर्बंधात असलेलं महाराष्ट्र राज्य टप्प्याटप्याने अनलॉक होणार असल्याचं बोललं जात आहे. कोणकोणते निर्बंध कशा पद्धतीने हटवून सवलती देण्यासंदर्भातील अहवाल टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांना पाठवला आहे. सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याचा निर्णय मात्र लगेच घेतला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

रेल्वे प्रवासी संघटना आणि सामान्य नागरिकांकडून सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल ट्रेन सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. मात्र, राज्य सरकार सावध भूमिका घेत तुर्तास तरी सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल ट्रेन सुरू करणार असल्याचं बोललं जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!