Share

नांदुऱ्यात कांद्याची निर्यातबंदी उठवीण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा मोर्चा…

Published On: 

नांदुरा : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर घातलेली बंदी तात्काळ मागे घ्यावी, या मागणीसाठी नांदुरा तालुका काँग्रेस कमिटीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले आहे. यावेळी केंद्र सरकारविरोधात निदर्शने करून सरकारचा निषेध करण्यात आला. केंद्र सरकारने कांद्याचे दर अवाक्यात राहावेत, यासाठी निर्यातबंदी जाहीर केली आहे.

या निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याएवजी कमी दराने कांदा विकावा लागेल. एकीकडे कोरोनामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना  दुहेरी आर्थिक फटका बसण्याची भीती आहे. शेतकरीविरोधी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली असल्याने संपूर्ण देशातील व राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मध्य सरकार प्रती तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

शेतकरी विरोधातील अन्यायग्रस्त निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी आज नांदुरा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करून सरकारचा निषेध करण्यात आला. तसेच निवेदन देण्यात आले.

यावेळी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस नीलेश पाऊलझगडे, नांदुरा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भगवान धांडे, केशव मापारी, पुरुषोत्तम झाल्टे अतुल, आशा गोंड, सुनीता देशमुख, सुनीता गोंड, मानसी देशमुख, संदीप बोचरे, नंदू गोंड, बंटी पाटील, राजू हाडे, ज्ञानेश्वर डांबरे, विनल मिरगे, सागर काटे, विनोद आढाव, राजू हिवाळे, शंकर बोदडे, शुभम लांडे, गजानन पाटील, वाल्मीक मुकुंद, शालिग्राम तांगडे, शुभम ढवळे, अतुल तांदळे, रमेश कांडेलकर, नारायण कांडेलकर, उत्तम कांडेलकर, सोपान वक्ते, नवृत्ती हिंगणकर, रामेश्वर बघे, विजय ढोले, कैलास नामगे, नारायण झाल्टे उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या:-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!