आर्वी : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियानाचे मुख्य अधिकारी यांनी वर्धा जिल्हापरिषदचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांना १० रोजीच्या पत्रान्वये उमेद मध्ये कार्यरत असणाऱ्या विविध कंत्राटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची टांगती तलवार उभी राहिली आहे. त्यामुळे आर्वी तालुक्यातील उमेदचे कर्मचारी व विविध गावातील महिला ग्रामसंघा मधील पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आर्वी तालुक्यातून १ हजार पत्र पाठवून करार वाढविण्यासाठी तसेच १० तारखेचे पत्र रद्द करण्याची मागणी व बाह्य संस्थाला अभियान देऊ नये या बाबत मागणी केली आहे.
महिला सशक्तीकरणासाठी तसेच ग्रामीण भागाचा विकास साध्य करण्यासाठी उमेदचे कर्मचारी, पदाधिकारी कार्यरत आहेत. महीला बचत गटाच्या माध्यमातून आजीविका संबंधी तसेच कृषी सखीच्या माध्यमातून दुग्ध व्यवस्थापन, शेळी पालन इत्यादी शेती संबंधित उद्योग धंद्याला नवनवीन तंत्राज्ञाची जोड देऊन गावातील व्यक्तींचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या २,५०० रुपयांच्या मानधनावर कार्यरत आहे.
मायक्रो फायनान्स मध्ये १८ ते २४ टक्के व्याजदराने कर्ज काढत असलेल्या महिलांना बचत गटाच्या माध्यमातून शासकीय योजना व कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिल्या जात होते. उमेदच्या साक्षरता सखींच्या माध्यमातून गावातील निरक्षरतांना साक्षर करण्याचे काम सुरू होते. विमा सखींच्या माध्यमातून ग्रामीण भाग वैयक्तीक तथा ग्रामीण उद्योगाला विम्याचे कवच मिळण्यासाठी कार्यरत होत्या त्याच बरोबर मॉक्रो ए. टि. एम. व्दारे गावातील महीला व पुरूषांची बँकेच्या व्यवहाराची कामे करून देतात.
१० सप्टेंबरच्या पत्रामुळे आर्वी तालुक्यातच नव्हे महाराष्ट्रात नव्याने सुरू झालेल्या अभियानाला बंद करून खाजगी कंपनीकडे अभियान वळते करणार असल्याच्या भीती आहे. ११ महिण्यानंतर करार पुन्हा नव्याने करू नये असे मुख्य कार्यपालन अधिकारी यांना सुचित केल्याने उमेशच्या पदाधिकारी, सी. आर. पी.,यांच्यावर बेरोजगारी तर येणारच परंतु गावातील वक्तिक विकासाच्या योजना राबविण्यातही खिळ बसेल.
यामुळे आर्वी तालुक्यातून तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती आर्वी येथील पूर्ण उमेद कर्मचारी व गावस्थरावर काम करत आलेल्या गटाच्या ३०० समूह संसाधन व्यक्ती, ६ प्रभागसंघ व्यवस्थापक व ५ प्रभाग समनव्यक यांचे सहकार्य ने १ हजार तर वर्धा जिल्ह्यातून १० हजार आणि महाराष्ट्रातून ४ लाख पत्र मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठवून दिलेल्या शासकीय पत्राचा फेरविचार करून कंत्राटी कर्मचाऱ्यांचा करार वाढवून देण्याची मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:-
- सुप्रिया सुळे आणि ठाकरे पितापुत्रांच्या अडचणीत वाढ, निवडणूक प्रतिज्ञापत्रांची फेरपडताळणी होणार ?
- पोलीस अचानक ठाकरे सरकार पाडण्याइतके सक्षम कसे झाले ?, भाजप नेत्याचा प्रहार
- गृहमंत्र्यांना हे बोलणं शोभत नाही ; प्रवीण दरेकरांचा घणाघात
- नांदुऱ्यात कांद्याची निर्यातबंदी उठवीण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा मोर्चा…
- पोलीस अचानक ठाकरे सरकार पाडण्याइतके सक्षम कसे झाले ?, भाजप नेत्याचा प्रहार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

