Share

‘शेतक-यांचे मरण हेच मोदी सरकारचे धोरण’, खत दरवाढी विरोधात काँग्रेसचं ‘घंटानाद’ आंदोलन

Published On: 

मुंबई : गेल्या काही महिन्यात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने डोकं वर काढले आणि त्यातच पेट्रोल, डिझेल सोबतच घरगुती गॅस, डाळी, खाद्यपदार्थांच्या किंमतींचे दरही आस्मानाला भिडले आहेत. यामुळे सामान्य माणूस त्रस्त झाला असून घर चालवायचे कसे? असा प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थित होत आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसताना आता खासगी रासायनिक खतांच्या किंमतीमध्येही सरासरी ६०० ते ७०० रूपये एवढी विक्रमी दरवाढ केली गेली आहे.

यामुळे या खतांच्या दरवाढीला आता विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला जबाबदार धरत टीकास्त्र सोडलं आहे. खत दरवाढीविरोधात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘ ‘शेतक-यांचे मरण हेच मोदी सरकारचे धोरण’ असून शेतकरी विरोधी तीन काळे कायदे आणल्यानंतर आता रासायनिक खतांच्या किंमती वाढवून शेतक-यांना उद्धवस्त करण्याच्या मोहिमेला मोदींनी वेग दिला आहे,’ असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले, ‘दिडपटीने वाढलेल्या खतांच्या किंमतीमुळे शेतक-यांना शेती करणे परवडणार नाही व मोठ्या उद्योगपतींना शेती कंत्राटीपद्धतीने देण्याशिवाय त्याच्यापुढे पर्याय राहू नये म्हणूनच ही दरवाढ केली आहे असा आरोप करून दोन दिवसात ही अन्यायकारक खत दरवाढ मागे घ्यावी अन्यथा काँग्रेस पक्ष राज्यभर घंटानाद आंदोलन करेल,’ असा इशारा देखील पटोलेंनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!