औरंंगाबाद : बीड रोडवरील चित्तेगाव जवळील उड्डाणपुलाजवळ झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या शुभम सुनिल गुडेकर (वय ३०,रा.गिरनार तांडा,ता.पैठण) या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
हा अपघात ११ जुलै रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास चित्तेगाव उड्डाणपुलाजवळ घडला होता. या अपघातात नवनाथ देवराव केदारे (वय ३०), आकाश गणेश चव्हाण (वय १८) दोघे रा.गेवराई तांडा, पैठण रोड हे जखमी झाले असून त्यांच्यावर घाटी रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या अपघाताची नोंद बिडकीन पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
दरम्यान, बीड रस्त्यावर सध्या महामार्गाचे काम सुरु आहे. पावसाळ्याचे दिवस आणि काही ठिकाणी असलेला कच्चा रस्ता सध्या या परिसरात अपघाताला निमंत्रण देत आहे. महामार्गाची कामे लवकरात लवकर करून रस्ता सुस्थितीत करण्याची मागणी जोर धरत आहे. या प्रकरणी बिडकीन पोलीस तपास करीत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘योगींनी दोन मुलांऐवजी जास्त मुलं जन्माला घालावी हे धोरण आणले पाहिजे’
- ‘पंकजा तुम्ही जास्त बोलता…’ ; ‘त्या’ बैठकीत मोदींनी घेतली भाजप नेत्यांची शाळा
- ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांना महाराष्ट्रातून तडीपार करा’
- यशोमती ठाकूर यांची मध्यस्थी अन् भूमीपुत्रांवरील अन्याय दूर ; 48 तरुणांची वाचवली नोकरी
- खराब रस्त्यांची दुरुस्ती करा आणि त्यानंतर खुशाल सायकल ट्रॅक बनवा, नागरिकांची मनपाकडे मागणी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

