वैजापूर: वैजापूर तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात वाळु तस्करांनी धुमाकुळ घातला असून वैजापूर तालुक्यातील बाजाठान येथे बुधवारी (दि.७) पहाटे चार वाजेच्या सुमारास वाळू वाहतूक करताना ट्रॅक्टरखाली दबून येथील ज्ञानेश्वर रामू दळे (वय ३८) हा तरुण कामगार जागीच ठार झाला आहे. म्हाताऱ्या आईवडिलांना एकुलता एक मुलगा गेल्याने त्यांच्यावर मोठे संकट उभे राहिले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सकाळी जेसीबीच्या साहाय्याने गोदावरी नदी पात्रातील वाळू भरण्याचे काम सुरु होते. येथील भोसले यांच्याकडेच हा तरूण कामावर होता. ज्ञानेश्वर दळे यांच्याशी घटने अगोदर अर्धा तास वडीलांनी एवढा उशीर का झाला म्हणून मोबाईल वर चर्चा केली. अन तासाभरात ही घटना घडली. घटनेनंतर जखमी दळे यांना ग्रामस्थांनी तत्काळ श्रीरामपुरला साखर कामगार रूग्णालयात दाखल केल्याचा निरोप आला.
परंतु डाॅक्टरानी त्यांना मृत घोषित केले. वाळू तस्कर परिसरातील गोदावरी नदीत रात्रभर सुसाट वाळू वाहतूक करत होते. ज्ञानेश्वर लवकर घरी परतला असता तर कदाचित ही घटना घडली नसती, अशी प्रतिक्रिया वडील रामू दळे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. रामू दळे यांचे यांचे मृत्यूस वाळू ठेकेदारांइतकेच पोलीस खाते जबाबदार आहेत. अशाप्रकारची चर्चा दिवसभर दबक्या आवाजात सुरू होती. तसेच रामू दळे हा आई-वडिलांना एकटाच कमावता मुलगा होता. त्याच्या या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘रोहयो’तील कामांच्या लेबर बजेटची आखणी करा, जि. प. सीईओंना अप्पर मुख्य सचिव नंदकुमार यांच्या सूचना
- विमानतळाऐवजी अमरप्रित चौकात हवा उड्डाणपूल, खासदारांसह सर्वच आमदारांची मागणी
- ‘ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पांची वेळेत निर्मिती करण्यास प्राधान्य’, नगरकरांना पालकमंत्र्यांचा दिलासा
- शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुखांची पदोन्नती करणार, शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांची माहिती
- ‘राणे साहेबांचे महत्व काँग्रेसला 10 वर्षात कळाले नाही ते भाजपने 2 वर्षात जाणलं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

