Share

‘प्रिय विराट, या लोकांमध्ये प्रचंड द्वेष भरलाय, कारण..’ मुलीवर अत्याचाराच्या धमक्यानंतर राहुल गांधींचे ट्विट

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : भारताचा पाकिस्तानविरुद्ध पराभवानंतर मोहम्मद शमीवर धार्मिक रंग देत त्याच्यावर टीका केली जात होती. कर्णधार विराट कोहलीने मात्र शमीला पाठिंबा दिला. आता यामुळेच काही माथेफिरुंनी विराटला लक्ष्य करत त्याची मुलगी वामिकाला बलात्काराच्या धमक्या दिल्या आहेत. सोशल मीडियावर सध्या एक स्क्रीनशॉट प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामध्ये वामिकाला बलात्काराच्या धमक्या दिल्या असल्याचे दिसत आहे. इतकेच नव्हेतर विराट आणि अनुष्काबद्दही चुकीचे भाष्य केले आहे.

दिल्ली महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राइम विभागाला पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे. यानंतर काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांनीही विराटसाठी खास ट्विट केलं असून त्यानं भारतीय कर्णधाराला सल्ला दिला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘प्रिय विराट, या लोकांमध्ये प्रचंड द्वेष भरला आहे, कारण त्यांना कोणीही प्रेम देत नाही. त्यांना माफ कर. संघाचे रक्षण कर’ असा सल्ला राहुल यांनी दिला आहे. दरम्यान, यापूर्वीही मोहम्मद शमीवर टीका करणाऱ्यांनाही राहुल गांधी यांनी सुनावलं होतं. ‘मोहम्मद शमी आम्ही तुझ्यासोबत आहोत. लोकांची मने घृणेने भरलेली असतात कारण त्यांना कोणी प्रेम दिलेलंच नसतं. त्यांना माफ करुन टाक’, असे ट्विट राहुल गांधींनी केले होतं.

आता या व्हायरल होणाऱ्या स्क्रीनशॉटवर सोशल मिडीयावर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. तसेच त्यांनी विराट कोहीलीसह त्याच्या कुटुंबाला पाठिंबा दिला जात आहे. दरम्यान पाकचा माजी कर्णधार इंझमाम उल हकनेही या गोष्टीचा निषेध व्यक्त करत कोणालाही खेळाडूच्या कुटुंबावर कोणतीच प्रतिक्रिया देण्याचा हक्क नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान या स्क्रीनशॉटचा संबंध थेट मोहम्मद शमीशी करण्यात येत आहे. विराटने शमीला पाठिंबा दिल्यामुळे त्याच्या मुलीला अशा प्रकारच्या धमक्या येत असल्याचे आता म्हटले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!