🕒 1 min read
मुंबई : मराठमोळी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये विविध देवीचे रूप धारण केले आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तिने कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या रुपात अपूर्वा दिसली होती. तर दुसऱ्या दिवशी ती मुंबादेवीच्या रुपात दिसली होती. तर आज तिसऱ्या दिवशी जया गौरी दुर्गा परमेश्वरीच्या रुपात दिसली आहे. याचे काही फोटो तिने सोशल मिडीयावर शेअर केले आहेत.
https://www.instagram.com/p/CUyaM3Iqs9o/?utm_source=ig_web_copy_link
या विविध रुपात दिसण्यासाठी ती आणि तिची संपूर्ण टीम खूप मेहनत घेत आहे. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत तिने देवीची माहिती दिली आहे. जया दुर्गा परमेश्वरी मंदिर कर्नाटकात उडपी येथे आहे अंबा परमेश्वरी,चामुनडेश्वरी,ओम शक्ति, दुर्गा, सरस्वती, काली अशी तिची रूपे आहेत. स्कंध पुराणात याचा उल्लेख आहे.
https://www.instagram.com/p/CUyaHlyKVwM/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, अपूर्वा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील ‘शेवंता नावाच्या भुमिकेमुळे घराघरांत पोहचली. तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने तिने अनेकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. सध्या तिचे नवरात्रीमधील विविध फोटो पाहून चाहते देखील तिचे कौतुक करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राणेसाहेब, हप्तेखोरांची नावं जाहीर कराच; वैभव नाईक यांचं ओपन चॅलेन्ज
- अतिवृष्टी बाधित एकही शेतकरी वंचित राहू नये यासाठी ड्रोनद्वारे पंचनामे करा : छगन भुजबळ
- उद्धव साहेबांची उपस्थिती आमच्यासाठी बाळासाहेबांचा आशिर्वाद- नितेश राणे
- नवाब मलिकांची आज पत्रकार परिषद; एनसीबीची पोलखोल करणार!
- हार्दिक पांड्या T20 वर्ल्ड कपमध्ये बॉलिंग करणार का? रोहितने दिले अपडेट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
