Share

हार्दिक पांड्या T20 वर्ल्ड कपमध्ये बॉलिंग करणार का? रोहितने दिले अपडेट

Published On: 

अबुधाबी : काही दिवसातचं टी 20 विश्वचषक 2021 ला सुरुवात होणार आहे. 17 ऑक्टोबरपासून ही स्पर्धा यूएईमध्ये आयोजित केली जाणार आहे. आयपीएल संपल्यानंतर लागेचच टी 20 विश्वचषकाला सुरुवात होईल. अशा परिस्थितीत, साहजिकच आयपीएल खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना परिस्थितीनुसार स्वतःशी जुळवून घ्यायचे असेल. टी -20 विश्वचषकासाठी घोषित केलेल्या भारतीय संघाचे खेळाडू देखील सध्याच्या आयपीएल हंगामाचा एक भाग आहेत. यातलाच एक म्हणजे अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या. मात्र, आयपीएलमधील एक सामना सोडला तर हार्दिक सातत्याने फ्लॉप फॉर्ममध्ये दिसला आहे.

हार्दिकने २०१९ ला पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर पुनरागमन केले. पण हार्दिक आधीसारखी सतत गोलंदाजी करताना दिसला नाही. मार्च महिन्यात इंग्लंडविरुद्ध पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत त्याने गोलंदाजी केली. मात्र, नंतर आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात तो गोलंदाजी करू शकला नाही. यूएईत मुंबईला चारपैकी केवळ एका सामन्यात विजय मिळाला तरी हार्दिक केवळ फलंदाज म्हणून संघात होता.

त्यामुळे आता टी-२० विश्वचषकात हार्दिक गोलंदाजी करणार की नाही असे प्रश्न सर्वत्र उपस्थित होत आहेत. यावर आता टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्मा याने हार्दिक गोलंदाजी करणार की नाही याचा खुलासा केला आहे.

रोहितनं यावेळी सांगितलं की, ‘हार्दिक पांड्यानं अजून बॉलिंग सुरू केलेली नाही. फिजियो, ट्रेनर्स आणि मेडिकल टीम त्याच्यासोबत काम करत आहे. त्यानं आजवर एकही बॉल टाकला नाही, इतकंच मला माहिती आहे. आम्ही प्रत्येक मॅचनंतर त्याचा फिटनेसचा आढावा घेतला आहे. त्याच्यात दर दिवशी सुधारणा होत आहे. त्यामुळे आगामी आठवडाभरात तो बॉलिंग करण्यासाठी तयार होईल, अशी आशा आहे. पण, याबाबत अचूक माहिती डॉक्टर किंवा फिजियोच देऊ शकतात.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!