Share

ख्रिस गेलच्या पोस्टवर डेव्हिड वॉर्नरचा भन्नाट रिप्लाय, फोटो व्हायरल

Published On: 

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या लाटीत अनेक मान्यवरांनाही या संसर्गाची लागण झाली आहे. तसेच या काळात देशभरात अनेक ठिकाणी अपुऱ्या औषधामुळे आणि अपुऱ्या ऑक्सिजनमुळे रुग्णांना जिव गमवावा लागत आहे. यादरम्यान भारतात सुरु असलेली आयपीएल स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करण्यात आली.

आयपीएल स्पर्धा अर्ध्यातच रद्द झाल्याने अनेक खेळाडू सुट्टी घालवत आहे. अधुन मधुन सोशल मीडीयावर अॅक्टिव्ह असतात. यादरम्यान वेस्ट इंडिजचा खेळाडू ख्रिस गेलने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला होता,या पोस्टमध्ये ख्रिस गेल टॉय कारसह पोज देताना दिसत आहे. गेलच्या या पोस्टवर ऑस्ट्रेलियन फलंदाज डेव्हिड वॉर्नरने गेलची फिरकी घेत ‘ती अगदी माझ्या कारसारखीच दिसते.’ अशी मजेशीर कमेंट केली. वॉर्नरने केलेली ही कमेंट चांगली व्हयरल होत आहे.

https://www.instagram.com/p/CPLtEReBK1O/

जुलै महिन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ ५ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामन्यांसाठी वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहेत. त्यावेळी वॉर्नर आणि गेल दोघेही आमने-सामने असतील. ख्रिस गेलने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये ५८ सामने खेळले आहेत. यात गेलने ३२.५४ च्या सरासरीने १६२७ धावा केलेल्या आहेत. तसेच गेलने अंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात २ शतक आणि १३ अर्धशतके झळकावली आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!