🕒 1 min read
मुंबई : सोनी टीव्हीवरील ‘इंडियन आयडल १२’ हा रिअॅलिटी शो लोकप्रिय होत असताना अनेकदा वादात सापडला आहे. काही दिवसांपूर्वी या सेटवर किशोर कुमार यांचा मुलगा आणि गायक अमित कुमार आले होते. त्यानंतर त्यांनी जो खुलासा केला त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यानंतर आता पुन्हा एकदा या शोची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत ‘इंडियन आयडल १२’ शोचा होस्ट आदित्य नारायण याने मोठा खुलासा केला आणि त्यानंतर त्याला प्रचंड ट्रोल करण्यास सुरवात झाली. यावर आता आदित्य गप्प न बसता ट्रोल करणा-यांना त्याने उत्तर दिले आहे.
एका मुलाखतीत तो म्हणाला की, ‘जे लोक मला ट्रोल करत आहेत, त्यांना माझा साष्टांग प्रणाम आणि देव देव त्यांचं भलं करो. पण मी स्वत: ला एका चित्त्याप्रमाणे समजतो आणि त्यामुळे कुत्र्यांच्या शर्यतीत मी किती वेगवान आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार नाही. कधीकधी आपला मुद्दा सिद्ध करणे म्हणजे आपल्या स्वत:च्या बुद्धिमत्तेचा आणि अनुभवाचा अपमान आहे. रिअॅलिटी शोच्या स्पर्धकांच्या बाजूने बोलताना मला हे जाणवत आहे. इंडियन आयडल हा गेल्या २६ आठवड्यांपासून आघाडीचा शो आहे. त्यामुळे मला बोलण्याची काही गरज नाही.’
तसेच या शो मधील शन्मुखप्रियाला बाहेर काढण्याची मागणी करत आहे. यावरही त्याने प्रतिक्रिया दिली आहे. शोचे स्पर्धक अगदी इतक्या कमी वयात आणि करिअरच्या सुरुवातीलाच टीकेला सामोरे जात आहेत. बाहेरच्या जगाचे कडवे सत्य त्यांना आतापासून कळत आहे. त्यांचे चाहते वाढत आहेत, तेवढेच टीका करणाऱ्यांची संख्याही वाढत आहेत. याचा मला व्यक्तिश: आनंद आहे, असेही तो म्हणाला. त्याच्या या प्रतिक्रियेनंतर सोशल मिडियावर पुन्हा एकदा त्याच्यावर टीका होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- आकडेवारी जाहीर ; देशात आतापर्यंत तब्बल ‘इतक्या’ लोकांचे झाले लसीकरण
- ‘मोदींच भावनिक होणे आणि डोळ्यातले अश्रू म्हणजे ठरवून केलेला कार्यक्रम’
- राजगडाच्या मातीतून ऐतिहासिक वस्तूंचा उलगडा; सह्याद्री प्रतिष्ठानला सापडल्या अनमोल गोष्टी !
- बारावीच्या परीक्षांचा निर्णय लवकरच; राज्य सरकारांना २५ मे पर्यंत सूचना देण्याची वेळनिलेश लंकेंच चहुबाजुंनी कौतुक; भाजप आमदार श्वेता महाले म्हणाल्या…


