पारनेर : राज्यासह देशभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांची संख्या प्रचंड वाढल्याने आरोग्य व्यवस्था कोलमडून गेली आहे. कुठे रुग्णांना बेड्स मिळत नाहीयेत तर कुठे ऑक्सिजन आणि रेमडेसीवीर सारखी इंजेक्शन्स मिळत नसल्याचे चित्र आहे. अपुऱ्या पडणाऱ्या आरोग्य व्यवस्थेमुळे अनेकांना प्राणास मुकावे लागत आहे.
अशातच, पहिल्या लाटेत नागरिकांची प्रचंड हेळसांड झाल्यानंतर या लाटेत काही लोकप्रतिनिधींनी जनतेच्या आक्रोशातुन बोध घेऊन रुग्णांच्या व्यवस्थेसाठी पुढाकार घेतला आहे. दरम्यान, मागील लाटेसह या लाटेत देखील रुग्णांसाठी सक्रिय काम करणारे पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या कामाची चर्चा सर्वत्र सुरु आहे.
निलेश लंके यांनी शरद पवार आरोग्य मंदिर कोविड सेंटर उभारले आहे. या सेंटरमध्ये एकूण अकराशे बेड असून शंभर ऑक्सिजन बेडची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. भाळवणी (ता. पारनेर) येथील या कोविड सेंटरमध्ये निलेश लंके स्वतः रुग्णांची सेवा करत असून त्यांच्या या कार्याची दखल जगभरात घेतली जात आहे. पारनेर तालुक्याच्या भावळणी येथे आमदार निलेश लंके यांनी शरदचंद्र आरोग्य मंदिर कोविड सेंटर उभारले असून त्याठिकाणीच ते कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत
दरम्यान, भाजप आमदार श्वेता महाले या काही दिवसांपूर्वी पारनेरला आल्या होत्या. यावेळी, त्यांनी या कोविड सेंटरला भेट देत आमदार निलेश लंकेच्या कार्याचं भरभरून कौतुक केलं होतं. ‘आमदार निलेश लंके हे विधानसभेतील आमचे चांगले सहकारी आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव नसतानाही ते गेल्या दोन वर्षांपासून कोरोना काळात राज्यात आदर्श काम करत आहेत,’ अशा शब्दांत श्वेता महाले यांनी कौतुक केलं. भाजपच्या आमदार असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराच्या चांगल्या कार्याचं कौतुक त्यांनी केल्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात असलेला आदर्श पुन्हा सर्वांना दाखवून दिला.
महत्वाच्या बातम्या
- ‘त्या’ अधिकाऱ्याच्या विधानाशी आमचा संबंध नाही; या लढाईत आम्ही सरकार सोबत आहोत – सीरम
- ‘मोदींच भावनिक होणे आणि डोळ्यातले अश्रू म्हणजे ठरवून केलेला कार्यक्रम’
- राजगडाच्या मातीतून ऐतिहासिक वस्तूंचा उलगडा; सह्याद्री प्रतिष्ठानला सापडल्या अनमोल गोष्टी !
- बारावीच्या परीक्षांचा निर्णय लवकरच; राज्य सरकारांना २५ मे पर्यंत सूचना देण्याची वेळ
- नवीन पेट्रोलपंप सुरू करण्यासाठी ५० लाख रुपयांची मागणी! पैशासाठी विवाहितेचा छळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
