दिल्ली : देशात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र तरीही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्यावर्षी पासून राज्यासह देशभरात कोरोना रोगाने माजवलेल्या हाहाकारामुळे शैक्षणिक क्षेत्रला देखील मोठा फटका बसला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे महिन्याभरापूर्वीच सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द केल्याचे केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश निशंक पोखरीयाल यांनी जाहीर केले. यासोबतच, बारावीच्या परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या असून त्यांची तारीख नंतर जाहीर केली जाईल असे कळवण्यात आले होते. गेल्या काही आठवड्यांमध्ये बारावीच्या परीक्षा देखील रद्द केल्या जाव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे. मात्र, यामुळे प्रवेश प्रक्रियेबाबत मोठा संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.
याच पार्श्वभूमीवर रमेश पोखरियाल निशंक यांनी आज (23 मे) रोजी भारतातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शिक्षणमंत्र्यांची, शिक्षण सचिवांची आणि राज्य परीक्षा बोर्डांच्या अध्यक्षांची बैठक बोलावली होती. ही बैठक पार पडली असून राज्य सरकारांना २५ मे पर्यंत सूचना देण्याची मुदत देण्यात आली आहे.
आजच्या बैठकीनंतर रमेश पोखरीयाल म्हणाले, ‘मी सर्व राज्यांना त्यांच्या सूचना २५ मे पर्यंत पाठवण्याची विनंती करतो. मला विश्वास आहे की आम्ही लवकरच योग्य निर्णयापर्यंत पोहोचू आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांच्या मनातील संभ्रमता देखील दूर करू. विद्यार्थी आणि शिक्षण यांचे आरोग्य, सुरक्षा आणि भवितव्य हे आमच्यासाठी सर्वाधिक प्राधान्याचे आहे,’ असं सांगतानाच त्यांनी उपस्थित केंद्रीय मंत्री व सर्व राज्यांच्या प्रतिनिधींचे आभार मानले आहेत.
I thank all the Hon'ble Chief Ministers, Education Ministers, and officers associated with the world's largest education system for participating in the high-level meeting chaired by Hon'ble Minister of Defence Shri @rajnathsingh Ji. pic.twitter.com/i4e8p5lH90
— Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) May 23, 2021
आता केंद्र सरकार बारावीच्या परीक्षा कशा पद्धतीने घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर, आज दिवसभरात ट्विटरवर ‘CancleBoardExams’ हा विषय ट्रेंडिंग म्हणजेच सर्वाधिक चर्चेत राहिला आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्याची मागणी वाढत असून पुढील प्रवेश प्रक्रियांबाबत संभ्रम निर्माण होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘त्या’ अधिकाऱ्याच्या विधानाशी आमचा संबंध नाही; या लढाईत आम्ही सरकार सोबत आहोत – सीरम
- ‘मोदींच भावनिक होणे आणि डोळ्यातले अश्रू म्हणजे ठरवून केलेला कार्यक्रम’
- राजगडाच्या मातीतून ऐतिहासिक वस्तूंचा उलगडा; सह्याद्री प्रतिष्ठानला सापडल्या अनमोल गोष्टी !
- कोरोनावर निश्चितच विजय मिळवू, कोरोनाची तिसरी लाट आपण थोपविणारच – तात्याराव लहाने
- नवीन पेट्रोलपंप सुरू करण्यासाठी ५० लाख रुपयांची मागणी! पैशासाठी विवाहितेचा छळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

