Share

१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या मोफत लसीकरणासाठी दरेकर मुंबई मनपा आयुक्तांच्या भेटीला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महानगरपालिकेने पारदर्शकपणे लसीकरणाचा कार्यक्रम राबवावा या आणि अशा विविध मागण्यांसाठी भाजप मुंबईचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा आणि विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी मुंबई मनपा आयुक्त इक्बालसिंह चहल यांची भेट घेतली. या वेळी चहल यांच्यासमोर भाजपने विविध मागण्या ठेवल्या आहेत.

मुंबईत लसीचं ढिसाळ नियोजन होत असून, महापालिकेने पारदर्शकपणे लसीकरण कार्यक्रम राबवावा तसेच १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकांना मोफत लस द्यावी, ही मागणी  या वेळी भाजपच्या शिष्टमंडळाने केली आहे. या सर्व मागण्याचे एक निदेनही मनपा आयुक्तांना देण्यात आले आहे. यामध्ये मुंबईतील ४५ वर्षावरील नागरिकांना लसीचा ज्यादा पुरवठा करण्याकरिता राज्य सरकारकडे आग्रह धरावा तसेच १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याकरिता राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.

राज्यात लसीकरणावरुन भाजप आणि सत्ताधारी महाविकास आघाडी यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. त्यात मुंबई महानगर पालिकेत शिवसेनेची सत्ता असल्याने भाजपचे आव्हन त्यांच्यापुढे आहे. आगामी काळात मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका देखील आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!