Share

‘…नुसता बोलाचा भात आणि बोलाची कढी’; दरेकरांचा ठाकरेंना टोला

Published On: 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील एकूण कोरोनाची परिस्थिती, प्रार्थना स्थळे खुली करण्याचा विषय, मुंबई लोकल प्रवासाची सर्व सामान्यांस मुभा, मेट्रो कारशेड प्रकल्प आदी विषयांवर भाष्य केले. तर, त्यांनी शेतकऱ्यांच्या कष्टाचा देखील उल्लेख केला मात्र आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीविषयी काहीही न बोलल्याने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

सुरुवातीला लॉकडाऊनमुळे शेतमालाचा निर्माण झालेला प्रश्न, त्यानंतर बोगस बियाणं, कीड आणि अतिवृष्टीमुळे हाती आलेलं उभ्या पिकाचं नुकसान झालेला शेतकरी सुलतानी संकटात देखील सापडला आहे. प्रवीण दरेकर यांनी अतिवृष्टी भरपाईसाठी अजून कोणतीही मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही यावरून ठाकरे सरकारवर त्यांनी निशाणा साधला आहे.

“मुख्यमंत्री महोदय तुम्ही लाइव्ह आला, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असं सांगितलं, जूनपासून सप्टेंबरपर्यंत झालेल्या अतिवृष्टीत सर्वस्व गमावलेल्या शेतकऱ्यांना एक दमडीची मदत तुम्ही दिली नाही… ती मदत अगोदर द्या… नुसता बोलाचा भात आणि बोलाची कढी नको.” असा टोला लगावत त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नी सरकारचं लक्ष वेधलं आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!