Share

भाजपच्या मेळाव्यातून फोटो गायब,रावसाहेब दानवे नाराज ?

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : औरंगाबादमधील भाजपच्या कार्यकर्ता मेळावा नाराजीनाट्यामुळे चर्चेत आला आहे. या मेळाव्याला भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे अनुपस्थित राहिले. कार्यक्रमस्थळी रावसाहेब दानवे यांचा फोटो लावला नसल्याने दानवे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

News18 lokmat ने दिलेल्या वृत्तानुसार, रावसाहेब दानवे यांच्या फोटो लावला नसल्याचे मेळाव्याच्या आयोजकांना लक्षात आल्यानंतर चालू कार्यक्रमात रावसाहेब दानवे आणि हरिभाऊ बागडे यांचे फोटो चिटकावण्यात आले. शेवटी बागडे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. मात्र रावसाहेब दानवे मात्र गैरहजरच राहिले. त्यामुळे दानवेंची अनुपस्थिती या कार्यक्रमात चर्चेचा विषय झाला आहे.

दरम्यान, औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून भाजपही यामध्ये मागे नाही. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये भाजपचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. दानवे यांच्या मराठवाड्यात चांगले वजन आहे त्यामुळे पक्षाला त्यांची नाराजी परवडणारी नाही. आता दानवे यांची नारजी भाजप कशी दूर करणार हे पाहणे कुतूहलाचा विषय बनला आहे.

हेही पहा –

https://www.youtube.com/watch?v=x1OMSDr8zqk

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!