Share

चक्रीवादळाच्या तीव्रतेमुळे अनेक बोटींचे नुकसान ; राज्य सरकार मदत जाहीर करणार

Published On: 

मुंबई : भीषण तौक्ते चक्रीवादळ हे सोमवारी रात्री गुजरातच्या सौराष्ट्र किनाऱ्यावर धडकलं. यादरम्यान १८५ किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने वारे वाहत होते. तर महाराष्ट्रासह मुंबईतही या चक्रीवादळाने हाहाकार माजवला. तौत्के चक्रीवादळामुळे मुंबई शहर, उपनगर तसेच ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरु आहे. तर महाराष्ट्रासह मुंबईतही या चक्रीवादळाने हाहाकार माजवला. तौत्के चक्रीवादळामुळे मुंबई शहर, उपनगर तसेच ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तर यामुळे ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर खात्याचे मंत्री व मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या मुंबईतील विविध किनारपट्टी ठिकाणांना भेट दिली. यावेळी त्यांनी मालाड-मढ, खारदांडा, माहिम व कुलाबा येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली व मच्छिमार बांधवांना दिलासा दिला. याबाबतची माहिती त्यांनी ट्वीट करून दिलेली आहे.

सोमवारी अरबी समुद्रात उसळलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागातील मच्छीमारांचे फार नुकसान झालेले आहे. या नुकसानग्रस्त भागाची अस्लम शेख यांनी अधिकाऱ्यासह पाहणी केली. यावेळी अस्लम शेख म्हणाले की, या चक्रीवादळामुळे मच्छीमार नौका, जाळी व किनारपट्टीनजीकची घरे यांचे नुकसान झाले आहे. हवामान खात्याकडून तौक्ते वादळाची पूर्वसूचना मिळाल्यानंतर मच्छीमारांनी आपल्या नौका नांगरुन ठेवल्या होत्या. तरीही वादळाच्या तीव्रतेमुळे बोटींचे नुकसान झाले. तसेच, झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर मदत जाहीर करण्यात येईल, असे अस्लम शेख यांनी सांगितले.

दरम्यान, तौत्के चक्रीवादळानं कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिलाय. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी भागात आणि संपूर्ण जिल्ह्यात वादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस २ दिवसांचा दौरा करणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!