Share

पूरग्रस्त शेतकऱ्यांना सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मिळणार नुकसान भरपाई- अनिल बोंडे 

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा:- सांगली, कोल्हापूर, कोकण आणि विदर्भात आलेल्या महापूरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पूरग्रस्त शेतकऱ्यांना सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात नुकसान भरपाई शासनाकडून दिली जाणार असल्याचे राज्याचे कृर्षीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले आहे . कोकणातील पूरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुंबई येथे आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते.

दरम्यान राज्यात पूरस्थितीमुळे ४ लाख ७५ हजार हेक्टर क्षेत्रफळाचे नुकसान झाले. यांचे पंचनामे अंतिम टप्यात आहेत. सांगली, कोल्हापूरमध्ये ४ लाख, कोकणात ४६ हजार आणि विदर्भात ३० हजारापर्यंत हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे.कोकणात सर्वात जास्त नुकसान भात शेतीचे आणि फळबागांचे झाले आहे. त्यामुळे भातशेतीला तिप्पट अनुदान देण्याची मागणी सिंधुदूर्गचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी केली आहे. यावर शासनाची कमिटी विचार करणार असल्याचे कृर्षीमंत्र्यांनी सांगितले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!