सिंधुदुर्ग : अरबी समुद्रातील तोक्ते चक्रीवादळामुळे सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोरोना परिस्थितीत रुग्णालयांचा विद्युत पुरवठा खंडित होऊ नये तसेच ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहील यादृष्टीने अगोदरच तयारी करण्यात आली असून प्रशासन देखील सज्ज आहे.

हे चक्रीवादळ आता गोव्याकडून महाराष्ट्र किनारपट्टीच्या बाजूने पुढे सरकत आहे. यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्गसह रायगडमध्ये समुद्र खवळल्याचं पाहायला मिळतयं. दुपारपासूनच सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. यामुळे किनारपट्टीलगत समुद्राचं पाणी शिरण्यासह इतर गावांमध्ये वारा व पाऊस यामुळे झाडं कोसळण्यासह पत्रे व कौल फुटून मोठं नुकसान झालं आहे.

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यलयाकडून देण्यात आलेल्या प्राथमिक माहितीनुसार तौक्ते चक्रीवादळामुळे ४४७ घरांच नुकसान झालं आहे. यासोबतच, १४३ ठिकाणी झाडे कोसळली आहेत. तर, १४ शासकीय इमारतींचे नुकसान झाले असून २३ विद्युतपोलही पडले. तर, १४४ व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे. पुढील २४ तास देखील कोकणासाठी महत्वाचे असून हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. यामुळे, प्रत्यक्षात झालेल्या नुकसानीचा अधिक वाढण्याची शक्यता आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले बंदरात मोठमोठ्या लाटा उसळत आहेत. @InfoSindhudurg #CycloneTauktae pic.twitter.com/otLYfazaij
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) May 16, 2021

महत्त्वाच्या बातम्या
- कर्करोगग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारने केली मोठी सोय !
- लग्नाच्या दिवशीच वधूची प्रियकरासोबत गळफास घेत आत्महत्या!
- कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांनी कधी लसीकरण करून घ्यावे ? घ्या जाणून !
- रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ लसीची दुसरी खेप हैदराबादमध्ये दाखल
- ‘महाराष्ट्राची प्रगती पचत नाही म्हणूनच फडणवीस असे उद्योग करतायत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

