Share

लग्नाच्या दिवशीच वधूची प्रियकरासोबत गळफास घेत आत्महत्या!

Published On: 

जालना : भोकरदन तालुक्यातील मालखेडा येथे रविवारी (दि.१६) पहाटे सुमारे पाच वाजेच्या दरम्यान एका प्रेमी जोडप्याने एकाच दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. नववधू स्नेहा राजू आव्हाड या युवतीच्या अंगावर हळद लागलेली असताना लग्नाच्या दिवशीच आपल्या प्रियकरासोबत गळफास घेऊन दोघांनीही आपली जीवन यात्रा संपवली.

नवनाथ सुरेश गायकवाड (२१) व स्नेहा राजू आव्हाड (१८) या दोघांनी गळफास लावून घेत आपला जीवनप्रवास संपवला आहे. लग्नाच्या दिवशीच एका प्रेमी जोडप्याने गळाफास घेतलाने एकच खळबळ उडली आहे. एकीकडे प्रेम प्रकरण तर दुसरीकडे घरच्यांचा विवाहासाठी आग्रह होत असल्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मालखेडा येथे नवनाथ गायकवाड या तरुणाचा टायर पंक्चरचा व्यवसाय होता. नवनाथ याचे त्यांच्याच नात्यातील स्नेहा राजू आव्हाड या तरुणी सोबत वर्षभरापासून प्रेम संबंध जुळले होते. आज दुपारी स्नेहाचा विवाह तालुक्यातील कोळेगाव येथील शुभम संतोष साळवे या तरुणाशी पार पडणार होता. मात्र विवाहाच्याच दिवशी स्नेहा ही नवनाथ सोबत पळून गेली. कोळेगाव येथून पहाटे दोघेजण मालखेडा येथे आले. त्याठिकाणी असलेल्या नवनाथ याच्या वडीलांचे जुने घर आहे. दोघांनी याठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!