हैदराबाद : कोरोनावर मात करण्यासाठी देशातील अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेल्या जनता लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहे. मात्र, एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
लसींचा तुटवडा असल्याने मोजक्याच ठिकाणी लसीकरण केले जात आहे. तर, नोंदणी केल्यानंतरच लसीकरण होत असले तरी साठा उपलब्ध झाला नसल्याचे कारण लसीकरण केंद्रावर दिले जात असल्याने अनेक नागरिकांना विना लसीकरणच माघारी यावं लागत आहे. कोविड लसीकरण मोहिमेमध्ये हातभार लावण्यासाठी ‘स्पुटनिक व्ही’ ही भारतात वापरली जाणारी पहिली परदेशी निर्मित लस बनली आहे. ‘स्पुटनिक व्ही’ लसची पहिली खेप १ मे २०२१ रोजी भारतात आली होती.
आता रशियन लस ‘स्पुटनिक व्ही’ ची दुसरी खेप आज रविवार १६ मे रोजी हैदराबाद येथे आली. लवकरच देशात ‘स्पुटनिक व्ही ‘च्या लसीकरणास सुरुवात होणार आहे. देशात सद्या मंद गतीने लसीकरण सुरु आहे. कोवॅक्सिन आणि कोविशील्ड या दोन लसींच लसीकरण सुरु आहे. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या माहितीनुसार ‘स्पुटनिक व्ही’ या आयात लसीच्या एक डोसची किंमत ९४८ रुपये अधिक ५ टक्के जीएसटी म्हणजे ९९५ रुपये ४० पैसे असेल. यामध्ये लस टोचून घेण्याच्या किंमतीचा समावेश नाही.
दरम्यान राज्यातला मृत्युदर आता दीड टक्के आहे. काल दिवसभरात राज्यात 39,923 नव्या बाधितांची भर पडली. त्यामुळे आता राज्यातल्या कोरोना बाधितांची एकंदर संख्या 53,09,215 वर पोहोचली आहे. काल दिवसभरात राज्यात 53,249 रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता 88.68 शतांश टक्के झालं. सध्या राज्यात कोविड 19 च्या 5 ,19 , 254 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘महाराष्ट्राची प्रगती पचत नाही म्हणूनच फडणवीस असे उद्योग करतायत’
- सरकारची पोलखोल करण्यासाठी भाजप नेमणार कायदेतज्ज्ञांची समिती : चंद्रकांत पाटील
- सावधान ! चक्रीवादळामुळे उद्या रायगडमध्ये रेड अलर्ट तर मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट
- ‘डिअर राजीव, वुई विल मिस यू’, सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ व्हिडिओची चर्चा
- पुणे सावरतंय ! आज कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट


