मुंबई : देशभरात पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोनाची स्थिती गंभीर असून केंद्र सरकार कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरल्याचा ठपका मोदी सरकावर ठेवण्यात येत आहे. सोशल मीडियातूनही मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारवर टीका होत आहे.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अलीकडच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेली पत्रं आणि विविध काँग्रेस नेत्यांची वक्तव्य डोळ्यापुढे ठेवत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल एक पत्र सोनिया गांधी यांना पाठविले असून, त्यांना महाराष्ट्रातील स्थितीची आणि त्याचा संपूर्ण देशातील कोरोना लढ्यावर होणारा परिणाम याची जाणीव करून दिली आहे. यासोबतच, यालाच महाराष्ट्र मॉडेल म्हणायचे का आणि ते देशाने स्वीकारायचे का? असा सवाल उपस्थित करत महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर तोफ डागली आहे.
फडणवीसांच्या या पत्रावरून त्यांना काँग्रेससह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी लक्ष्य केलं आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. ‘विरोधी पक्षनेते काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना महाराष्ट्राच्या बाबातीत पत्र लिहून खोटी बातमी पसरवण्याचं काम करत आहेत. महाराष्ट्रात सुरुवातीपासून सरकार गांभीर्यानं काम करत आहे. राज्य सरकारने करोना रुग्ण, मृतांचा आकडा कधीही लपवलेला नाही,’ असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.
जगभर महाराष्ट्राच्या कामाची नोंद लोक घेत आहेत. मुंबई मॉडेलची चर्चा होतेय, हे पचत नसल्याने विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis @INCIndia अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहून महाराष्ट्राबद्दल खोटी बातमी पसरवण्याचे काम करत आहेत.
– @nawabmalikncp यांचा आरोप pic.twitter.com/TIseVxWH0L
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) May 16, 2021
यासोबतच, ‘मुंबईसह महाराष्ट्राची सुप्रीम कोर्ट, इतर कोर्ट, निती आयोग यांनी प्रशंसा केली आहे, हे त्यांना पचत नाही. गुजरातमध्ये ७१ दिवसांत ६१ हजार करोनाच्या केसेस लपवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. गोव्यात ऑक्सिजन मिळत नाही म्हणून लोकांचा मृत्यू होत आहे. उत्तर प्रदेशात दोन हजार लोकांना नदीत प्रवाहित करण्यात आल्याचं समोर येत आहे. महाराष्ट्र चांगली कामं करतंय हे पचत नसल्याने सरकारला बदानाम करण्याचा त्यांचा उद्योगच असेल. सोनिया गांधींना पत्र लिहून ते बदनामी करत आहेत
महत्त्वाच्या बातम्या
- संकटात भर : चक्रीवादळाचा कोकणासह मुंबईतील ऑक्सिजन प्रकल्पांना धोका; सतर्कतेचे आदेश
- सरकारची पोलखोल करण्यासाठी भाजप नेमणार कायदेतज्ज्ञांची समिती : चंद्रकांत पाटील
- सावधान ! चक्रीवादळामुळे उद्या रायगडमध्ये रेड अलर्ट तर मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट
- ‘डिअर राजीव, वुई विल मिस यू’, सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ व्हिडिओची चर्चा
- पुणे सावरतंय ! आज कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

