🕒 1 min read
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या निगडीतील अस्तित्व मॉल येथील कार्यालयातील २७ सर्व्हरवर नुकताच सायबर हल्ला झाल्यानंतर सुमारे पाच कोटीचे नुकसान झाल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे. यावरुन स्मार्ट सिटी कार्यालयातील माहिती तंत्रज्ञान यंत्रणा सक्षम नसल्याचे दिसून येत आहे. स्मार्ट सिटीच्या निगडी येथील कार्यालयात कंट्रोल आणि कमांड सेंटर निर्माण केले आहे. सदरचा गुन्हा घडल्यानंतर सुमारे अकरा दिवसांनी खाजगी कंपनीने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे यामध्ये संशयास्पद वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी गंभीर आरोप केले आहेत. ‘मे. टेक महिंद्रा या कंपनीस स्मार्ट सिटीकडील अंदाजे ४५० कोटीचे कामकाज देण्यात आलेले आहे. सदर कामाकाजापैकी अंदाजे रक्कम रुपये १५० कोटी फक्त डेटा सेंटर तयार करण्यासाठी खर्च झाले आहेत. इतका खर्च करूनही सदर डेटा सेंटरमधील डेटा सुरक्षित नाही.’ अशी टीका राजू मिसाळ यांनी केली आहे.
तर, ‘महापालिकेचे सर्व्हर व डेटा दिनांक १९/०२/२१ ते दिनांक २१/२/२१ पर्यंत ऑनलाईन कामकाज बंद ठेवून सदरचा डेटा नव्याने तयार करण्यात आलेल्या डेटा सेंटरमध्ये कार्यान्वीत करण्याचे नियोजन होते. परंतु काही अधिका-यांनी नविन डेटा सेंटरचे कामकाजावर आक्षेप घेऊन सदरचे कामकाज योग्य प्रकारे झालेले नसून डेटा सुरक्षितेची हमी देता येत नसल्याने सदर ठिकाणी डेटा ठेऊ नये, असे सुचविल्याने महापालिकेचा डेटा नष्ट होण्यापासून वाचलेला आहे.’ अशी माहिती देखील त्यांनी दिली.
मात्र, ‘१५० कोटी खर्च करूनही सर्व्हर व डेटा सुरक्षित नसल्याने महापालिका आपला महत्वाचा डेटा व सर्व्हर हिंजवडी येथील खाजगी डेटा सेंटर मध्ये ठेवते म्हणजे काय ? सायबर हल्ल्यामुळे अंदाजे ५ कोटी रुपये नुकसान झाल्याचे एफ. आय. आर. वरून कळते. अशा प्रकारेच जनतेच्या पैशाची मोठ्या प्रमाणात लुट होत आहे.’
‘सायबर हल्ला होऊन अंदाजे १० ते १२ दिवस उशिराने एफ. आय. आर दाखल करण्याचे प्रयोजन काय ? संबंधित अधिकारी सदर प्रकरण मिटवामीटवी करत होते का ? व तसे न झाल्याने नाईलाजास्तव एफ. आय. आर. दाखल करावी लागलेली आहे. सदर एफ. आय. आर. ठेकेदारामार्फत दाखल झालेली आहे. महापालिकेच्या अधिकायांना त्याचे सोयर सुतक नाही का ? त्यांची जबाबदारी आहे की नाही ? सदरचा पैसा जनतेचा आहे. कर रूपी प्राप्त झालेल्या पैशाची उधळपट्टी नाही का ?’ असे सवाल देखील राजू मिसाळ यांनी उपस्थित केले आहेत.
दरम्यान, त्यांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे. ‘स्मार्ट सिटी सह. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी तसे न करता स्वत:वरील जबाबदारी ठेकेदारावर ढकलली त्यामुळे त्यांची चौकशी होणे गरजेचे आहे, यात नक्कीच त्याचा हात मळमळटले आहेत. सत्ताधा-यांना चुकीचे काम करणा-या अधिकारी किंवा ठिकेदार यांना पाठिशी घालण्याचे काम करावयाचे आहे. सत्ताधा-यांना जनतेच्या कररुपी पैशाचे काहिही घेणे देणे राहिलेले दिसत नाही. ‘ असे आरोप देखील राजू मिसाळ यांनी केले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- बधाई हो…ताराने दिल्या बुमराहला लग्नच्या शुभेच्छा, पहा पोस्ट
- नुकतच लाँच केलेल्या होंडाच्या ‘या’ शानदार बाईकमध्ये दोष; कंपनीने गाड्या परत मागवल्या
- ‘काहे दिया परदेस’ फेम सायली संजीवचा बोल्ड अंदाज…
- दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी भारतीय संघात ‘हे’ दोन बदल होण्याची शक्यता
- विलास चौधरी यांना राज्यसरकारचा औरंगाबाद विभागातून पुरस्कार घोषीत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

