औरंंगाबाद : वाढदिवसाचा केक मित्रासोबत तलवारीने कापून त्याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल करणाऱ्यास गुन्हेशाखा पोलिसांनी जेरबंद केले. नितेश उर्फ मॉन्टी पंढरीनाथ चव्हाण (वय २७, रा.मुकुंदनगर, मुकुंदवाडी) असे वाढदिवसाचा केक तलवारीने कापणा-याचे नाव असून पोलिसांनी त्याच्या ताब्यातून एक तलवार, मोबाईल असा एकूण २९ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त रविंद्र साळोखे यांनी मंगळवारी (दि.१८) दिली.
नितेश उर्फ मॉन्टी चव्हाण याचा नुकताच वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त नितेश उर्फ मॉन्टी चव्हाण याने आपल्या मित्रासोबत तलवारीने केक कापून वाढदिवसाचे फोटो आणि व्हीडीओ सोशल मिडियावर व्हायरल केले असल्याची माहिती गुन्हेशाखेला मिळाली होती. गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त रविंद्र साळोखे, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक मनोज शिंदे, जमादार संतोष सोनवणे, चंद्रकांत गवळी, भगवान शिलोटे, आनंद वाहुळ, विशाल पाटील, रितेश जाधव आदींच्या पथकाने नितेश उर्फ मॉन्टी चव्हाण याला ताब्यात घेतले.पोलिसांनी त्याच्या ताब्यातून एक तलवार, २८ हजार रूपये किंमतीचा मोबाईल असा एकूण २९ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
वाढदिवसाचा केक तलवारीने कापून फोटो सोशल मिडियावर व्हायरल केल्याप्रकरणी नितेश उर्फ मॉन्टी चव्हाण व त्याचा मित्र राजू म्हस्के यांच्याविरूध्द मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- उस्मानाबादेत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट मात्र मृत्युदर कायम
- अखेर ‘त्या’ वादावर पडदा ; जयंत पाटलांच्या प्रकल्पांना मंजूरी
- पंतप्रधान मोदी उद्या महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांतील कोरोनाचा आढावा घेणार
- पुलाखाली आढळला युवकाचा मृतदेह; बोरगावात एकच खळबळ
- बीसीसीआयच्या महिला आणि पुरुष संघातील भेदभावावर हरमनप्रितने टाकला पडदा, दिले ‘हे’ उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

